शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

स्वपक्षीय आमदारांना फालेरोंचे टोमणे

By admin | Updated: January 8, 2017 01:37 IST

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वपक्षीय आमदारांनाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी जोरदार

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वपक्षीय आमदारांनाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी जोरदार टोमणे मारले. गेली पाच वर्षे आमच्या पक्षाचे काही नेते पणजीतील काँग्रेस हाउसमध्ये आले नाहीत; पण दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात मात्र सध्या ते धाव घेत आहेत, असे शेरे फालेरो यांनी मनमुरादपणे हसत हसत पत्रकार परिषदेवेळी मारले. फालेरो म्हणाले की, पक्षबांधणीवर मी सगळा भर दिला. गेली पाच वर्षे आमच्या पक्षाच्या आमदारांना काँग्रेसच्या पणजीतील कार्यालयात येण्यास वेळ मिळाला नाही; पण त्यांना आपण दिल्लीत धाव घेण्यास भाग पाडले. आता अनेकजण दिल्ली वाऱ्या करत आहेत. फालेरो यांनी कुणाचे नाव घेतले नाही; पण काँग्रेसच्या कोणत्या आमदारांना ते टोमणे मारत आहेत हे सर्वांच्याच लक्षात आले. काँग्रेसचे काही आमदार सध्या युती हवी म्हणून धडपडत असून ते संघटितपणे दिल्लीला जाऊन दिग्विजय सिंग यांना भेटून आले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी फालेरो यांना, युतीशिवाय सत्तेवर येऊ असा काँग्रेसला विश्वास आहे काय, असे विचारले असता, आपण त्याविषयीचे उत्तर येत्या १० तारखेनंतर देईन, असे फालेरो यांनी सांगितले. १० रोजी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची व ९ रोजी छाननी समितीची बैठक होत आहे. आम्ही आजपर्यंत चाळीसही मतदारसंघांत स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे, असे फालेरो म्हणाले. (खास प्रतिनिधी)