शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्स विक्रेते पोहोचले शाळेच्या दारात, गोवा विधानसभेत चिंता व्यक्त

By admin | Updated: August 9, 2016 19:32 IST

गोव्यात शाळेपासून जवळच अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची खळबळजनक माहिती वास्कोचे भाजप आमदार कार्लुस वाझ यांनी विधानसभेत दिली.

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 09 -  गोव्यात शाळेपासून जवळच अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची खळबळजनक माहिती वास्कोचे भाजप आमदार कार्लुस वाझ यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणात शाळेच्या बाहेर एका ड्रग्स विक्रेत्याला अटक करण्यात आल्याची कबुलीही पोलीसांनी दिली आहे. अंमली पदार्थांची विक्री आता शाळेच्या दारांत पोहोचली असल्यामुळे गोवा विधानसभेत चिंता व्यक्त केली. वास्को भागात शाळांना लागूनच अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांचा वावर असतो असे कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले. पोलीस त्यांच्यावर का कारवाई करीत नाहीत याचे स्पष्टीकरणही त्यांनी मागितले. या प्रश्नाला उत्तर देतांना जुलै महिन्यात दोन दिवसांच्या कालावधीत ४ जणांना लाखो रुपयांच्या अमली पदार्थांसह पकडले असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. २५ जुलै या दिवशी राजू हनुंमत्ता बुलर, फरहान, राझिया मुझावर आणि २७ जुलै या दिवशी सुभाष साहू यांना अमली पदार्थांसह वास्को येथे अटक करण्यात आली आहे. सुभाष साहू याला एका शाळेच्या बाहेर पकडण्यात आले होते असे त्यांनी सांगितले. अंमली पदार्थाची समस्या केवळ वास्कोची नसून ती संपूर्ण गोव्याची असल्याचे ते म्हणाले. वर्ष २०१२ ते जून २०१६ या कालावधित पोलिसांनी वास्को भागात अमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली नसल्याची लेखी माहिती गृहखात्याकडून मिळालेल्या उत्तरात यावेळी देण्यात आली. त्याचा उल्लेख करून आल्मेदा यांनी पोलीस आणि अंमली पदार्थ व्यवहारवाले यांचे साटेलोटे असण्याची शक्यताही व्यक्त केली.