शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नव्या रुग्णालयावर 216 कोटींचा खर्च अपेक्षित, शवागाराची पाहणी करू - विश्वजित राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 19:20 IST

मडगाव येथील नव्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या कामावर एकूण 216 कोटींचा खर्च येणार आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले आहे.

पणजी - मडगाव येथील नव्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या कामावर एकूण 216 कोटींचा खर्च येणार आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी (26 जुलै) विधानसभेत सांगितले आहे. आम्ही त्या रुग्णालयाचे शवागार अगोदर सुरू करता येईल काय याचा अंदाज घेऊ, त्यासाठी प्रत्यक्ष पाहणीही करू, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काही प्रश्न उपस्थित केले. सासष्टीतील व एकूणच दक्षिण गोव्यातील प्रेत आम्हाला मडगावच्या शवागारात ठेवताच येत नाहीत. ती अचानक पणजीला न्यावी लागतात व पुन्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी मडगावला घेऊन यावी लागतात, अशी तक्रार आमदारांनी केली. नव्या रुग्णालयाचे पूर्ण काम होईल तेव्हा होईल पण अगोदर त्या रुग्णालयाचे शवागार तरी सुरू करा, अशी विनंती आमदार डायस यांनी केली. त्यावर निश्चितच आपण ती शक्यता पडताळून पाहीन, असे मंत्री राणे यांनी सांगितले. नव्यारुग्णालयाचे जुन्या रुग्णालयाचे स्थलांतर हे टप्प्याटप्प्याने केले जाईल. रुग्णालयावरील खर्च वाढला आहे.रुग्णालयातील इंटेरिअरच्या कामावरच तीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असेही राणे यांनी सांगितले आहे.

तुम्ही मडगावच्या ईएसआय रुग्णालयाचे शवागार तथा तेथील पाच केबिनेट्स वापरात आणू अशी ग्वाही यापूर्वी विधानसभेत दिली होती, अशी आठवण कामत यांनी मंत्री राणे यांना करून दिली. त्यावर राणे यांनी आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली  असून आम्ही ईएसआयचे केबिनेट्स प्रेतांसाठी प्राधान्याने वापरात आणू, असे स्पष्ट केले. मडगावच्या रुग्णालयात अगोदर अ‍ॅन्जीओग्राफी व अ‍ॅन्जीओप्लास्टीची सोय करा. कारण आता कुणाच्याही छातीत दुखू लागले की, प्रथमच अ‍ॅन्जीओग्राफी वगैरे केली जाते. छातीत दुखते म्हणजे ब्लॉक्स असतातच, असे कामत म्हणाले. या मागणीची आम्ही दखल घेतो पण सरकारने जो स्टेमी कार्यक्रम सुरू केला आहे, त्यामुळे कुणालाही हृदयविकाराचा झटका आला की, पंचवीस हजार रुपयांचे अगोदर मोफत इंजेक्शन करून रुग्णाला स्थिर केले जाते. मग त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेईपर्यंत पुरेसा वेळ मिळत असतो, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.  

 

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर