शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

स्पोर्टिंगने आय-लीगमध्ये पुनरागमन करावे अशी सर्वांची इच्छा: भारतीय फुटबॉलपटू आदिल खान

By समीर नाईक | Updated: January 20, 2024 13:42 IST

पणजीस्थित क्लबमध्ये युवा व्यवस्थेतील प्रतिभा विपुल प्रमाणात आहे

समीर नाईक/ पणजी: स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाने विजयी मानसिकता विकसित केली असून तृतीय विभागीय आय-लीग विजेता हा संघ रविवारी वास्कोतील टिळक मैदानावर सुदेवा दिल्ली एफसीविरुद्ध द्वितीय विभागातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पणजी स्थित क्लबमध्ये युवा व्यवस्थेतील प्रतिभा विपुल प्रमाणात आहे, तर कर्णधार मार्कुस मास्करेन्हस, जॉयनर लॉरेन्सो आणि आदिल खान यांचा अनुभव भविष्य घडविण्यास मदत करीत आहे.

द्वितीय विभागामध्ये आठ संघ सहभागी होणार असून डबल राऊंड रॉबिन पद्धतीने ‘होम अँड अवे’ तत्त्वावर ही स्पर्धा होणार आहे. अव्वल दोन संघांना २०२४-२५ च्या आय-लीगमध्ये बढती दिली जाईल आणि तळाला राहिलेल्या दोन संघांना २०२४-२५ आय-लीग तृतीय विभागात खेळावे लागेल. २०१६ मध्ये स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर स्पोर्टिंग पुन्हा आय-लीगमध्ये पुनरागमन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.

सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आम्ही तिसऱ्या विभागाचे विजेते होण्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत एकजूट राखली आहेे. आमच्याकडे चांगले प्रशिक्षण पथक, व्यवस्थापन आहे. आम्ही आय-लीगसाठी पात्र व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही तयार आहोत, असे भारताचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आदिल खान याने सांगितले.

आय-लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, आमच्याकडे दर्जेदार युवा खेळाडू आहे. एक सीनियर खेळाडू म्हणून मी त्यांना मदत करत आहे आणि माझा अनुभव सामायिक करत आहे. सुरुवातीला आमच्याकडे अनुभवाची कमतरता होती पण आता त्यांच्यापैकी बहुतेकांना हा अनुभव मिळाला आहे आणि त्यामुळे द्वितीय विभागामध्ये खेळणे तुलनेने सोपे जाईल असे आदिल खान याने पुढे सांगितले.

संघ अधिक खेळाडूंना करारबद्ध करत आहेत. संघ बांधणी करणे कठीण काम असते. आम्हाला आमच्या योजनेवर ठाम राहावे लागेल, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार कृती करावी लागेल आणि एकत्र काम करावे लागेल, असेही आदिलला वाटते. अर्मांडो कुलासो आणि त्याचा सहाय्यक क्लायमॅक्स लॉरेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्टिंगने एक सामना शिल्लक असताना पदोन्नती मिळवली. एफसी बेंगळुरू युनायटेड, मुंबई केंकरे एफसी, स्पोर्टिंग क्लब बेंगळुरू, ऑरेंज एफसी आणि युनायटेड एससीसह गोव्याचा धेंपो एससी संघही या स्पर्धेत आहे.

टॅग्स :goaगोवाFootballफुटबॉल