पणजी : सरकारने नव्या आरोग्य विमा योजनेसाठी निविदा काढल्या असून तीन माणसांच्या कुटुंबासाठी अडीच लाख तर चार किंवा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबाला ४ लाख रुपयांचे विमा कवच मिळेल. २०२० पर्यंत ही योजना कार्यरत राहील, अशी घोषणा आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना केली. या योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तीन सदस्यीय कुटुंबाला दोन वर्षांसाठी ३०० रुपये हप्ता असेल तर ४ किंवा जास्त सदस्य असलेल्या कुटुंबाला ५०० रुपये हप्ता असेल. अनुसूचित जाती जमातींच्या लोकांना हप्त्यात ५० टक्के सवलत दिली जाईल. नोंदणी केल्यानंतर कुटुंब प्रमुखाला गोव्यातील पाच वर्षांचा निवास दाखला सादर करावा लागेल. (प्रतिनिधी) (वृत्त/२)
प्रत्येक गोमंतकीयाला
By admin | Updated: August 12, 2014 01:34 IST