शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लाच पोहचविण्याकरिता १४ शेल कंपन्या स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 02:13 IST

पणजी : लुईस बर्जर कंपनीने जैकाच्या कामांचे कंत्राट मिळविण्यासाठी राजकारणी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल चार कोटी

पणजी : लुईस बर्जर कंपनीने जैकाच्या कामांचे कंत्राट मिळविण्यासाठी राजकारणी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल चार कोटी रुपयांची लाच पोहचविण्यासाठी १४ कंपन्या स्थापन केल्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाच्या(ईडी) तपासात उघडकीस आली आहे. अंमलबजावणी विभागाच्या सूत्रांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. या गाजलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत, आमदार चर्चिल आलेमाव यांच्या तब्बल १ कोटी ९५ लाख रुपये किमतीच्या मालमत्ता जप्तीची कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोघांनाही शुक्रवारी जप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या. २00२ च्या मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याखाली ही कारवाई सुरू झाली आहे. न्यू जर्सीस्थित लुईस बर्जर कंपनीकडून राजकारण्यांपर्यंत तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत १४ शेल कंपन्यांमार्फत लाच पोहचविण्यात आली. कंपनीच्या ज्येष्ठ उपाध्यक्षांकडून आणखी माहिती मिळविण्यात येत असून त्यांना प्रश्नावली पाठवलेली आहे. संशयित अधिकारी तसेच कंपनीचे माजी अधिकारी यांच्याभोवती चौकशीचा फास आवळण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचेअधिकार प्रयत्न करीत आहेत. अशीही माहिती मिळते की सुरुवातीला २ कोटींचा सौदा ठरला होता, मात्र नंतर आणखी वाटाघाटी झाल्या आणि लाच म्हणून द्यावयाची रक्कम चार कोटींवर निश्चित झाली. राज्यात जैकाच्या १ हजार ३१ कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या कामांची कंत्राटे मिळविण्यासाठी २0१0 मध्ये ही लाच दिल्याचा आरोप आहे. त्यावेळी कामत मुख्यमंत्री तर आलेमाव बांधकाममंत्री होते. या घोटाळ्याच्याच काळात या दोघांनी खरेदी केल्याचा संशय असलेल्या १ कोटी ९५ लाख रुपये किमतीच्या मालमत्तेवर टाच आणलेली आहे. आता जप्तीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. लुईस बर्जर कंपनीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष तसेच भारतातील कारभार पाहणारे जेम्स मॅकलंग यांच्या अधिक चौकशीसाठी अंमलबजावणी अधिकारी प्रयत्नात असून तसे अमेरिकेला कळविले आहे. मॅकलंग सध्या अमेरिकन कारागृहात आहेत.अंमलबजावणी विभागाने दिगंबर कामत यांचा घोगळ-मडगाव येथील ४ हजार ४७ चौरस मीटर भूखंड, ताळगाव येथील बंगला आणि ४१ लाख ३५ हजार रुपयांच्या ठेवींवर तर चर्चिल आलेमाव यांच्या मालकीच्या ७५ लाखांच्या मालमत्तेवर टाच आणली. चर्चिल यांच्या मालमत्तेत फात्राडे-वार्का येथील आठ सदनिकांचा समावेश आहे. मालमत्ता जप्तीची कायदेशीर नोटीस दोघांनाही बजावली गेली आहे आणि त्याची प्रत दिल्लीतील मनी लाँडरिंग प्रतिबंधक लवादालाही पाठविण्यात आली आहे. १८0 दिवसांत मालमत्ता जप्त करायची आहे. त्यासाठी महिनाभरात अधिकृत तक्रार सादर केली जाईल. (प्रतिनिधी)