शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजीचे विधेयक सध्या अशक्यच!

By admin | Updated: August 2, 2015 03:15 IST

पणजी : राज्यातील डायोसेझनच्या इंग्रजी माध्यमातील ज्या शाळांना सध्या अनुदान मिळते, त्यांना अनुदान मिळणे सुरूच राहील. आपण तशी ग्वाही दिलीच आहे.

पणजी : राज्यातील डायोसेझनच्या इंग्रजी माध्यमातील ज्या शाळांना सध्या अनुदान मिळते, त्यांना अनुदान मिळणे सुरूच राहील. आपण तशी ग्वाही दिलीच आहे. तथापि, आपण राज्याच्या मुख्यमंत्रिपदी असून आपल्या डोक्याला बंदूक लावून जर कुणी आताच विधेयक आणा, असा दबाव आणत असेल, तर ते आपण मान्य करणार नाही. सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात इंग्रजी शाळांचे अनुदानविषयक विधेयक आणले जाणार नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. या अधिवेशनात विधेयक आणले जात नसेल तर आपण उपोषणाचे आंदोलन मागे घेणार नाही, असे फोर्स संघटनेचे प्रमुख सावियो लोपिस यांनी जाहीर केले आहे. गेले सहा दिवस ते आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रतिनिधीने मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ते म्हणाले की, सध्या ज्या इंग्रजी शाळांना अनुदान मिळते ते सुरू ठेवले जाईल, असे आपण सांगितलेच आहे. तरीही कुणी आडमुठी भूमिका घेऊ नये. डायोसेझनच्या इंग्रजी शाळांना अनुदान सुरू ठेवण्याचा जो निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे, त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी यापूर्वी आलेले विधेयक हे सभागृहाच्या चिकित्सा समितीकडे आहे. पुढील विधानसभा अधिवेशनात आपण ते विधेयक आणीन, अशी ग्वाही आपण आजदेखील देतो. आम्ही आमच्या मंत्री व आमदारांना आझाद मैदानावर शुक्रवारी पाठवून तेथील आंदोलकांना सरकारची ही भूमिका सांगितली आहे. मात्र, ते आंदोलन मागे घेत नाहीत. रास्ता रोको केलेल्या पालकांविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपण पालकांना दोष देत नाही; पण रास्ता रोको आंदोलनात कोण होते, याची माहिती आपण घेईन. त्यांच्याविरुद्ध कारवाई होणार नाही. पोलिसांना किंवा आपल्याला या नियोजित रास्ता रोकोची कल्पना नव्हती, असे म्हणता येणार नाही. आपल्याला पोलीस खात्याने कल्पना दिली होती. तथापि, पालकांवर लाठीमार करू नका किंवा अश्रुधूरही सोडू नका, अशी सूचना आपण पोलिसांना केली होती. त्यामुळे सतरा ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झाले, तरी कुठेच आंदोलक विरुद्ध पोलीस अशी झटापट झाली नाही. विधानसभेत मी राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने बोलताना खूप जबाबदारीने बोललो आहे. मुख्यमंत्री म्हणून मला समतोल अशी भूमिका घ्यावी लागते. (खास प्रतिनिधी)