शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

मुख्यमंत्रिपदी अखेर पार्सेकर

By admin | Updated: November 9, 2014 03:17 IST

पर्रीकर यांचा राजीनामा : नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ; आवेर्तान तूर्त बाहेर

पणजी : शनिवारी दुपारी अपेक्षेप्रमाणे मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नवे मुख्यमंत्री म्हणून सायंकाळी लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शपथ घेतली. राजभवनवर झालेल्या सोहळ्यावेळी आणखी नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली गेली. यात अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांचाही समावेश आहे. आवेर्तान फुर्तादो यांना तूर्त मंत्रिपद दिले गेलेले नाही. पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री म्हणून रविवारी दिल्लीत होणाऱ्या सोहळ््यावेळी शपथ घेणार आहेत. भाजपच्या विधिमंडळ गटाची शनिवारी दुपारी तीन तास बैठक झाली व त्या बैठकीवेळी पार्सेकर यांची नेतेपदी निवड करण्यात आली. अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून केलेले बंड तिथेच शमले. काबो राजभवन येथे भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या आणि संघ नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. पार्सेकर यांच्यासह फ्रान्सिस डिसोझा, म.गो. पक्षाचे सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर, तसेच भाजपचे दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, महादेव नाईक, रमेश तवडकर, मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा यांचा मंत्री म्हणून शपथविधी पार पडला. राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांनी या सर्वांना पद व गोपनियतेची शपथ दिली. लवकरच विस्तार व खाते वाटप शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्रिमंडळात एकूण दोन जागा रिकाम्या आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्या भरल्या जातील. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे येत्या आठवड्यात दिल्लीहून गोव्यात परततील. त्या वेळी त्यांच्यासह आम्ही इतरजण चर्चा करून सर्व मंत्र्यांसाठी खाते वाटप करू. पर्रीकर यांच्याकडे जेवढी खाती होती, तेवढी खाती मी माझ्याजवळ ठेवणार नाही. गोव्यातील खाण व्यवसाय आणि अन्य प्रश्नांबाबत आम्ही टीम आॅफ मिनिस्टर्स मिळून एकत्र निर्णय घेऊ. मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल, असे पार्सेकर यांनी सांगितले. पार्सेकरांची मराठीतून शपथ मुख्यमंत्री पार्सेकर यांनी मराठीतून शपथ घेतली. मराठीतून शपथ घेणारे अलीकडील पस्तीस वर्षांतील ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांच्यासह ढवळीकर बंधू, मांद्रेकर, परुळेकर, महादेव नाईक, तवडकर यांनीही मराठीतून शपथ घेतली. डिसोझा यांनी कोकणीतून, तर श्रीमती साल्ढाणा यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. राज्यात तीनवेळा भाजपचे सरकार अधिकारावर आले; पण पर्रीकर यांच्यानंतर दुसरे कुणीच मुख्यमंत्री झाले नव्हते. पार्सेकर हे दुसरे ठरले. (खास प्रतिनिधी)