शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक निधीचे भाजपकडून संकलन!

By admin | Updated: January 10, 2016 01:38 IST

पणजी : प्रादेशिक आराखड्याच्या नावाखाली घोटाळे, माड हे झाडच नव्हे अशी तरतूद करून भाटकारांना दिलेली

पणजी : प्रादेशिक आराखड्याच्या नावाखाली घोटाळे, माड हे झाडच नव्हे अशी तरतूद करून भाटकारांना दिलेली मोकळीक, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे एकतर्फी निर्णय, अशा विविध प्रकारे भारतीय जनता पक्ष सध्या सरकारच्या मदतीने निवडणूक निधी गोळा करू लागला आहे, असा आरोप अपक्ष आमदार विजय सरदेसाई, रोहन खंवटे व नरेश सावळ यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनात आम्ही सरकारला याबाबत उघडे पाडू, असेही त्यांनी जाहीर केले. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हेही नंतर या तीन आमदारांसोबत परिषदेस बसले. सरदेसाई म्हणाले की माड हे झाडच नव्हे, असे ठरविणारी कायदेशीर तरतूद भाजप सरकारने केली आहे. म्हणजेच भाटकार वाट्टेल तसे माड कापू शकतील. मग या भाटांचे रूपांतर सेटलमेंट झोनमध्ये केले जाईल. भाजपच्या आमदारांनी दुकानेच थाटली आहेत. या पक्षाने निवडणूक निधी गोळा करण्याची मोहीम उघडली आहे. जो पक्ष गोहत्येबाबत गळा काढतो, तो पक्ष कल्पवृक्षाची कत्तल करण्यास मात्र मोकळे रान देतो. सरदेसाई म्हणाले की, सुरत-गुजरात येथील अमूल डेअरीला गोव्यात व्यवसाय करण्यासाठी सरकारने मान्यता दिली. गोव्यातील एकमेव अशा गोवा डेअरीला संपविण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. अशा प्रकारचे निर्णय हे सरकार विधानसभेत घेत नाही. चर्चाही करत नाही. गोव्यातील अनेक जमिनी संरक्षण दलाच्या ताब्यात असून, आम्ही त्याबाबत विधानसभेत अर्धा तास चर्चेची मागणी करू. आमदार खंवटे म्हणाले की, राज्यात हजारो रोजगार संधी निर्माण करणे ही पार्सेकर सरकारची घोषणा होती; पण बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने काही केले नाही. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या निर्णयांच्या नावाखाली फक्त मद्यनिर्मिती प्रकल्पांना मान्यता दिली जात आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम, पोलीस व अन्य खात्यांमध्ये डेटा आॅपरेटर, पोलीस उपनिरीक्षक अशा पदांसाठी हजारो उमेदवारांच्या मुलाखती घेऊनही जाणीवपूर्वक त्यांची निवड केली जात नाही. मलिदा लाटणे हा यामागील हेतू आहे का, हे सरकारने सांगावे. (खास प्रतिनिधी)