शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चाची चौकशी

By admin | Updated: March 3, 2017 01:48 IST

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, असे वृत्त दै. लोकमतने गेल्या २७ फेब्रुवारी

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, असे वृत्त दै. लोकमतने गेल्या २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्यानंतर निवडणूक आयोगाचे गोवा मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल (आयएएस) यांनी तत्काळ गंभीर दखल घेऊन चौकशीसाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमली आहे. सविस्तर चौकशी करून आपल्याला अहवाल सादर करावा, असे त्यांनी समिती स्थापनेसंदर्भातील आदेशात म्हटले आहे.यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनीही निवडणूक खर्चाविषयी काही प्रश्न उपस्थित केले होते. निवडणुकीवेळी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने नेमका किती खर्च केला याविषयीची माहिती संकेतस्थळावर दिली जावी, अशी मागणी रॉड्रिग्ज यांनी केली होती. गेल्या २७ रोजी लोकमतने निवडणूक खर्चाचा आढावा घेतला. भाडोत्री वाहनांसाठी पाच कोटी रुपये, इंधनावर चार कोटी रुपये आणि किरकोळ खर्च तर तब्बल दहा कोटी रुपये, असा खर्च झाल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या मिळाली होती. मात्र, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. आयरिश रॉड्रिग्ज यांनी निवडणूक आयोगालाही दिल्लीत पत्र पाठवून खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने बहुतेक वाहने भाडेपट्टीवर घेतली होती. त्यात पस्तीस बसगाड्या तसेच चारशे मोटारींचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर छोटे मंडप उभारण्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च केले गेले. स्टेशनरी साहित्य खरेदीसाठी चौदा लाख रुपये खर्च केले गेले. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवर सात लाख रुपये, निवडणूक कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांवर सुमारे पाच कोटी रुपये, अशा प्रकारे विविध कारणांस्तव खर्च झाला आहे. सुरक्षेवरही मोठा खर्च झाला आहे. पोलिसांना दरदिवशी १४० रुपये भत्ता याप्रमाणे ८४ लाखांचा खर्च झाला. निवडणुकीवेळी ४० कोटींच्या खर्चाची तरतूद मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने केली होती. प्रत्यक्षात जास्त खर्च झाल्याचा दावा केला जातो. एवढा खर्च गरजेचा होता काय, हा खर्च अवास्तव झालेला आहे का, तसेच काही खर्च वाढीव प्रमाणात दाखविला का, या सगळ्यांची चौकशी संबंधित समिती करील, असे सूत्रांनी सांगितले. चौकशी समितीवर एकूण पाच अधिकारी असून त्यात संयुक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसह, अर्थ विभागाचे नोडल अधिकारी, मतदान केंद्रांच्या साहाय्यक नोडल अधिकारी, साहाय्यक लेखा अधिकारी आदींचा समावेश आहे. समितीने चौकशीचे प्राथमिक काम सुरू केले आहे. समिती आपला अहवाल कुणाल यांना सादर करील. (खास प्रतिनिधी)