शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

आठ पालिकांत सत्तेचे स्वप्न धूसर

By admin | Updated: October 30, 2015 02:18 IST

मडगाव : अकरापैकी ८ पालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार, या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या घोषणेला ४८ तासही उलटलेले नसताना भाजपची ही आशा धूसर होऊ लागली आहे.

मडगाव : अकरापैकी ८ पालिकांवर भाजपचा झेंडा फडकणार, या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केलेल्या घोषणेला ४८ तासही उलटलेले नसताना भाजपची ही आशा धूसर होऊ लागली आहे. कुंकळ्ळीची पालिका ज्योकिम आलेमाव यांनी भाजपच्या हातातून हिसकावून घेतलेली असतानाच आता काणकोण पालिकाही निसटण्याची चिन्हे आहेत. आपल्या ५ समर्थक नगरसेवकांना घेऊन माजी आमदार विजय पै खोत हे कोल्हापूरला रवाना झाल्याने काणकोण पालिका कब्जात घेण्याचे भाजपचे प्रयत्न धुळीस मिळण्याची चिन्हे आहेत. काणकोण पालिकेत ५-५ अशी स्थिती झाल्याने दोन्ही गटांकडून विरोधी गटाचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न झाले होते. अशा परिस्थितीत आपले नगरसेवक फुटू नयेत, यासाठी विजय पै खोत हे दिवाकर पागी, श्यामसुंदर देसाई या दोन नगरसेवकांसह तसेच महिला नगरसेवक छाया कोमरपंत यांचे पती सोयरू कोमरपंत, प्रार्थना गावकर यांचे पती रमाकांत गावकर व सुचिता धुरी यांचे वडील रत्नाकर धुरी यांना घेऊन कोल्हापूरला ठाण मांडून आहेत. हे सर्व नगरसेवक एकत्र असल्याची छायाचित्रेही सोशल मीडियावर प्रसारित झाली आहेत. अपक्ष उमेदवारांना घेऊन भाजपने कुंकळ्ळीतही नगरमंडळ घडविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ज्योकिम आलेमाव यांनी आपले कडवे विरोधक असलेले मारियो मोराईस यांच्याशीच हातमिळवणी करत भाजपचा डाव उधळून लावला. बुधवारी उशिरापर्यंत आमदार राजन नाईक यांच्या संपर्कात असलेले मोराईस यांना आलेमाव यांनी शेवटच्या क्षणी फोडून आपल्या बाजूने आणले होते. याशिवाय शशांक देसाई या भाजप समर्थक नगरसेवकालाही आपल्या गोटात सामील करून घेतले होते. काँग्रेसचे माजी आमदार ज्योकिम आलेमाव यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपच्या संपर्कात असलेले आणखी दोन नगरसेवक काँग्रेसला पाठिंबा देणार आहेत. केपे पालिकेतही भाजपला अपशकुन होण्याची शक्यता आहे. या पालिकेत भाजपच्या उमेदवारीवर निवडून आलेले एकमेव भाजप नगरसेवक मान्युएल कुलासो हेही आमदार बाबू कवळेकर यांच्या गटात सामील होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)