शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

जुवारी नदीवर आठ पदरी पूल

By admin | Updated: August 26, 2015 01:28 IST

पणजी : जुवारी नदीवर आठ पदरी केबलस्टेड पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून येत्या दोन महिन्यांत

पणजी : जुवारी नदीवर आठ पदरी केबलस्टेड पूल बांधला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली असून येत्या दोन महिन्यांत निविदा प्रक्रियेसह अन्य सोपस्कार पूर्ण केले जातील, अशी घोषणा बांधकाममंत्री सुदिन ढवळीक र यांनी मंगळवारी केली. येथे पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर यांनी सांगितले की, जुवारी नदीवरील समांतर केबलस्टेड पुलाचा पूर्ण प्रकल्प हा एकूण चार टप्प्यांचा आहे. पूल व पुलाला जोडणारे रस्ते मिळून एकूण १३.६३५ किलोमीटर लांबीचा सगळा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यात बांबोळी ते आगशी असे ८.२३५ किमी लांबीचे रस्ता चौपदरीकरणाचे काम केले जाईल. त्यावर ८२९.६० कोटी रुपयांचा खर्च येईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष केबलस्टेड पूल बांधला जाईल. त्यावर ८८०.७५ कोटींचा खर्च केला जाईल. तिसऱ्या टप्प्यात कुठ्ठाळी ते वेर्णा असे ४.३१६ किलोमीटर रस्त्याचे काम केले जाईल. त्यावर ७८३.०५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जुवारीवरील नव्या पुलाच्या कामाची पायाभरणी येत्या १९ डिसेंबर रोजी करावी, असे यापूर्वी ठरवले आहे. तथापि, केंद्रीय मंत्री गडकरी यांना वाटले, तर डिसेंबरपूर्वीच पायाभरणी होऊ शकते. (खास प्रतिनिधी)