शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील शिक्षकांना शाळेत हजर होण्याचे शिक्षण विभागाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 23:29 IST

कंटेनमेंट झोनमधील शाळा, कंटेनमेंट झोनमध्ये राहणा-या शिक्षकांना तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या शाळा इमारतींना हा आदेश लागू नाही. 

पणजी : शिक्षक तसेच शाळांमधील कारकून, शिपाई, सफाई कामगार आदी शिक्षकेतर कर्मचा-यांना उद्यापासून (दि. २४) शाळेत हजर होण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिला आहे. कंटेनमेंट झोनमधील शाळा, कंटेनमेंट झोनमध्ये राहणा-या शिक्षकांना तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या शाळा इमारतींना हा आदेश लागू नाही. 

ऑनलाइन किंवा ऑफलाइन धडे घेण्यासाठी अडचण असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी,  विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शाळा चालू होईपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन धडे द्यावेत. शिक्षकांनी वर्षभराचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करावा, शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळा सुरु होईपर्यंत वर्कशीट, लेक्चर्स इत्यादी तयार करावेत आणि ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेऊ न शकणा-या विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आदेशात म्हटले आहे.  

यांना आहे मुभा!ज्या शिक्षकांची किंवा शिक्षकेतर कर्मचा-यांची मुले शारिरिक अपंगत्त्व असलेली किंवा मतिमंद असतील तर त्यांना घरी राहून काम करण्यास मुभा आहे. परंतु त्यांनी नेहमीच फोनवर किंवा ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध असायला हवे. गरोदर महिला कर्मचा-यांना घरी राहून काम करण्याची मुभा देण्यात आली असून त्यांनीही फोनवर किंवा ऑनलाइन माध्यमातून कायम संपर्कात असणे आवश्यक आहे. 

विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शाळा १५ जुलैनंतरच विद्यार्थ्यांसाठी राज्यातील विद्यालये १५ जुलैनंतर सुरु होतील, असे जे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. त्याबद्दल विचारले शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षण ज्याच्या अखत्यारित येते ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय एकत्रितपणे पुढील मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करतील आणि त्यानुसारच शाळा, विद्यालये प्रत्यक्ष कधी सुरु होतील हे अवलंबून आहे.  

टॅग्स :goaगोवा