शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लीज क्षेत्रे, बंदर, जेटींवर असलेल्या 50 लाख टन लोह खनिजाचा ई लिलाव आज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 19:19 IST

५0 लाख ३४ हजार टन लोह खनिजाचा ई लिलाव आज होणार असून, खाण खात्याने त्यासाठीची सर्व तयारी केली आहे.

पणजी : ५0 लाख ३४ हजार टन लोह खनिजाचा ई लिलाव आज होणार असून, खाण खात्याने त्यासाठीची सर्व तयारी केली आहे. हा लिलाव झाल्यानंतर काही प्रमाणात खनिज वाहतूक सुरू होईल. २0१७ नंतर खनिजाचा ई लिलाव झाला नव्हता. त्यानंतर आता लिलाव होत आहे, असे खात्याचे संचालक आशुतोष आपटे यांनी सांगितले. खाण खात्याने वेगवेगळी लीज क्षेत्रे, बंदर, जेटी तसेच अन्य मिळून २३0 ठिकाणी असलेले खनिज या ई लिलावांसाठी निश्चित केले आहे. ५८ पासून ६५ ग्रेडपर्यंतचे खनिज यात आहे. प्रती टन ४00 रुपये मूळ दर निश्चित करण्यात आला असून कंपन्या आपली बोली लावणार आहेत. 

मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनतर्फे हा ई लिलाव होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात २२ ऑगस्टपासून ई लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जाहीर केले होते. तसेच डंप मायनिंगही हाताळून येत्या ऑक्टोबरपासून खनिज व्यवसाय सुरू करू. खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका सादर केली जाईल, अशा घोषणाही त्यांनी खाण खात्याचे मंत्री या नात्याने केल्या होत्या. न्यायालयीन मार्गाबरोबरच खाण प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्यासाठीही सरकार प्रयत्नरत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय बैठक याआधी खाण प्रश्नावर झालेली आहे. शहा हे योगायोगाने आज गुरुवारी गोवा दौ-यावर येत असून त्यांच्यासमोर आजही हा विषय येऊ शकतो. खाण कंपन्यांनी कळ सोसावी, कामगारांना कामावरून काढू नये, असे आवाहन करताना ज्या कामगारांना मार्च २०१८ नंतर कामावरून काढून टाकलेले आहे, त्यांच्यासाठी येत्या ऑक्टोबरपर्यंत म्हणजे दीड वर्षाच्या कालावधीसाठी आर्थिक पॅकेजही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले आहे. दरमहा ५ हजार रुपये या कामगारांना देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे.