शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

धोबी नसल्यानेही अडतात शस्त्रक्रिया गोमेकॉत दुर्दशा

By admin | Updated: May 22, 2014 18:27 IST

कपडे धुण्याबाबत वाद; कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने समस्या

धोबी नसल्यानेही अडतात शस्त्रक्रिया गोमेकॉत दुर्दशा : कपडे धुण्याबाबत वाद; कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने समस्या पणजी : धोबी नसल्याने रुग्ण व डॉक्टरांना स्वच्छ कपडे नाहीत आणि कपडे नसल्याने शस्त्रक्रिया अडून पडतात, असे एखाद्या शासकीय इस्पितळात घडू शकते का? बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात अशा प्रकारचा अनुभव काही वेळा येतो. आता तर तिथे कपडे तुंबले असून ते धुण्यासाठी कर्मचारी शोधण्याची व त्यांना विनवण्या करण्याची वेळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या (गोमेकॉ) व्यवस्थापनावर आली आहे. गोमेकॉसह सर्वच शासकीय इस्पितळांवर बोजा वाढत आहे. गोमेकॉत दाखल होणार्‍या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रोज कपड्याचे ढिग तयार होत आहेत. कपडे धुणारे कर्मचारी गैरहजर राहिले, तर स्वच्छ कपडे उपलब्ध होत नाहीत व त्यामुळे गोमेकॉत शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्याची वेळ येते. सध्या कपडे तुंबले असून मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने म्हापसा येथील शासकीय इस्पितळातील तिघा कर्मचार्‍यांनी गोमेकॉत कपडे धुण्यासाठी जावे, असा आदेश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला आहे. मात्र, कर्मचारी जाण्यास तयार नाहीत. जी कामे आम्ही करायची नाहीत, ती देखील आम्हाला करायला सांगितली जातात; पण सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार वेतनश्रेणी मात्र आम्हाला लागू केली जात नाही, असे काही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. हाड मोडलेल्या रुग्णासाठी प्लास्टरिंग करण्याचे कामही आम्हालाच सांगितले जाते, असेही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. गोमेकॉकडे सध्या रक्ताचे डाग वगैरे पडलेले कपडे धुण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे. (खास प्रतिनिधी)