फोंडा : मडकईतील नवदुर्गा देवस्थान संदर्भातील उच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात न्यायालयाने मंगळवारी फोंडा जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती दिल्याची तसेच देवस्थानचे महाजन मंडळ मूर्ती बदलण्यास मोकळे असल्याची अफवा पसरल्याने शेकडो भाविक आणि ग्रामस्थ मंदिरात जमा झाले. मात्र सायंकाळी उशिरा ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, जोपर्यंत पुढील सुनावणी होऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत देवस्थानासमोर ठाण मांडण्याचे ठरवून कोणत्याही परिस्थितीत मूर्ती बदलू न देण्याचा निर्णय भाविकांनी घेतला. मंगळवारी दुपारी मोबाईलवर एका ई-पोर्टलवरून या संदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचे तसेच देवस्थानचे महाजन नवदुर्गेची मूर्ती बदलण्यास मोकळे असल्याचे म्हटले होते. या बातमीमुळे मडकईत संभ्रम निर्माण झाला. (पान २ वर)
अफवेमुळे मडकईत तणाव
By admin | Updated: February 24, 2016 02:33 IST