शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या पर्यटन विकासाला 'डक बोटी'ने मिळणार चालना

By admin | Updated: October 16, 2016 02:23 IST

पाण्यावर आणि जमिनीवर चालणाऱ्या बससदृश डक बोटद्वारे मांडवी नदीतून जलसफर करण्याची कल्पना अखेर गोव्यात आता प्रत्यक्षात आली आहे. विशेष म्हणजे अडीच कोटींच्या

- सदगुरू पाटील, पणजी

पाण्यावर आणि जमिनीवर चालणाऱ्या बससदृश डक बोटद्वारे मांडवी नदीतून जलसफर करण्याची कल्पना अखेर गोव्यात आता प्रत्यक्षात आली आहे. विशेष म्हणजे अडीच कोटींच्या या विशेष वाहनाची निर्मिती गोव्यातच करण्यात आली आहे.जमिनीवर व पाण्यावरही चालेल असे वाहन गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात लवकरच येईल, अशी घोषणा गेल्या वर्षी सरकारने केली होती. त्या वेळी अनेक गोमंतकीयांना हे अशक्यप्राय वाटले होते. मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर डक बोट रस्त्यावरून धावत असल्याचे पणजीकरांनी पाहिले. रस्त्यावरून धावणारे हेच वाहन थेट मांडवी नदीतही उतरले. पर्यटकांनी डक बोटद्वारे मांडवीतही फेरफटका मारला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, आमदार नीलेश काब्राल, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांच्यासह निवडक पर्यटकांनी जलसफरीचा अनुभव घेतला. डक बोटीसाठी अमेरिकेतील तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. सध्या दोन बोटी तयार करण्यात आल्या आहेत. पर्यटकांच्या प्रतिसादानुसार त्यात वाढ करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सहा महिन्यांपूर्वीच डक बोट तयार झाली होती. मात्र, केंद्र सरकारच्या स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारच्या मान्यता मिळविण्याच्या प्रक्रियेत सहा महिन्यांचा वेळ गेला. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या डक बोटची सर्व प्रकारे केंद्रीय यंत्रणांनी चाचणी केलेली आहे. पाणी व जमिनीवरही चालणारे वाहन केवळ गोव्यातच आता आलेले आहे. देशात कुठेच अशा प्रकारचे वाहन नाही. गोव्यातच या वाहनाची निर्र्मिती झाल्याबाबत खूप आनंद व अभिमान वाटतो. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. पर्यटक मांडवीतील जलसफर अनुभवल्याशिवाय माघारी जाणार नाहीत.- लक्ष्मीकांत पार्सेकर, मुख्यमंत्री, गोवा