शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात उद्योगांना दुप्पट चटई निर्देशांक; मंत्री मॉविन गुदिन्हो यांची घोषणा

By किशोर कुबल | Updated: January 29, 2024 19:27 IST

गोव्यात उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोसाहन मिळावे तसेच अस्तित्त्वात असलेल्या उद्योगांना विस्तारासाठी वाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मॉविन यांनी सांगितले.

पणजी : गोव्यात अस्तित्त्वात असलेल्या उद्योगांना दुप्पट चटई निर्देशांक (एफएआर) देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला असून यामुळे कारखान्यांचे विस्ताराचे काम सोपे झाले आहे.

‘इन्वेस्ट २०२४’ परिषदेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी ही माहिती दिली. गुंतवणूकदारांच्या या परिषदेत दोन महत्त्वाचे समझोता करारही बड्या कंपन्यांनी सरकारकडे केले. एक समझोता करार सीआयआयचे अध्यक्ष तथा टीव्हीएस सप्लाय चेन सोल्युशन्स लि,चे चेअरमन आर. दिनेश यांच्याकडेही झालेला आहे.  याव्दारे एक हजार नोकय्रा निर्माण होणार असल्याचे मॉविन यांनी सांगितले.  

गोव्यात उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोसाहन मिळावे तसेच अस्तित्त्वात असलेल्या उद्योगांना विस्तारासाठी वाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मॉविन यांनी सांगितले. मॉविन म्हणाले की, ‘ सरकारने आता नवीन औद्योगिक धोरण व वेअरहाउसिंग धोरण आणले त्याचबरोबर औद्योगिक विकास महामंडळानेही काही नियम शिथिल करुन इज ॲाफ डुइंग बिझनेसच्या बाबतीत सुटसुटीतपणा आणला आहे. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत.          

आयटी हॅबिटॅट दोनापॉललाचआयटी हॅबिटॅट दोनापॉल येथेच येईल त्यासाठी आधीच जागा निश्चित झालेली आहे. भूतकाळात काय घडले या गोष्टी आता नकोत, असे मॉविन एका प्रश्नावर म्हणाले. पर्यावरणाभिमुख उद्योगांचे गोव्यात नेहमीच स्वागत केले जाईल, असे त्यांनी सांगितले. यामुळे आता आयटी हॅबिटॅट पुनरुज्जीवीत होईल, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, रसना ग्रुपचे सीएमडी पिरुझ खंबाटा यांनी आपला उद्योग समूह आता काजुधारित पदार्थ व पेये उत्पादित करणार असल्याचे जाहीर केले.