शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सॅल्यूट घेणे आवडत नाही : फडणवीस

By admin | Updated: May 11, 2015 02:16 IST

पणजी : सॅल्यूट घेणे आपल्याला आवडत नाही, ती ब्रिटिशांची पध्दत आम्हाला नको, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पणजी : सॅल्यूट घेणे आपल्याला आवडत नाही, ती ब्रिटिशांची पध्दत आम्हाला नको, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी केले. व्हीव्हीआयपी कल्चरची मानसिकता राजकारण्यांनी बदलली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. नक्षलवाद्यांचा धोका असल्याने आपल्याला झेड प्लस सुरक्षा असली तरी सुरक्षा रक्षकांचा एवढा ताफाही आपल्याला नको. सध्या पाच मोटारींचा ताफा आपल्याबरोबर असतो त्यातही कपात करावी, असे फडणवीस म्हणाले. महिला आर्थिक परिषदेसाठी ते गोव्यात आहेत. ते म्हणाले, ज्या ठिकाणी गरज आहे तेथे आणि जितकी गरज आहे तेवढीच सुरक्षा घेणे योग्य आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर झेड प्लस सुरक्षेमुळे १५ मोटारींचा ताफा दिला. मला इतकी सुरक्षा नकोच. त्यामुळे कमी करून ताफ्यातील मोटारी पाचवर आणल्या. त्या आणखीही कमी कराव्यात, अशी मागणी आहे; परंतु पोलीस तयार नाहीत. राजकारणात आपण अपघातानेच आलो, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. आपल्याला खरे तर वकील बनायचे होते. १८ व्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. २१ व्या वर्षी पालिका निवडणूक लढविण्याची संधी आली. खरे तर निवडणूक जाहीर झाली तेव्हा वय पूर्ण झाले नव्हते. त्याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी घटनेत ७४ वी दुरुस्ती आणली व त्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या त्याचा फायदा झाला. त्यानंतर मागे वळून बघितलेच नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)