शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुलांना आत्महत्येचे केंद्र बनवू नका : कामत

By admin | Updated: May 20, 2017 02:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : गोव्यातील पूल म्हणजे आत्महत्येचे केंद्र बनू नये. आत्महत्यांबाबत गोव्याचा क्रमांक देशात दहावा लागतो. मुख्यमंत्री मनोहर

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : गोव्यातील पूल म्हणजे आत्महत्येचे केंद्र बनू नये. आत्महत्यांबाबत गोव्याचा क्रमांक देशात दहावा लागतो. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या गंभीर विषयात लक्ष घालावे व राज्यातील सर्व पुलांच्या कडेला आत्महत्या प्रतिबंधक बॅरिकेड्स लावले जावेत, अशी मागणी गोवा विद्यापीठाच्या बॉटनी विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. नंदकुमार कामत यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.कामत यांनी म्हटले आहे, की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगभर पुलांच्या ठिकाणी आत्महत्या प्रतिबंधक उपाययोजना केली जाते. गोव्यासारख्या राज्यानेही अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने ठोस पाऊल उचलावे. पुलांच्या बाजूने जाळे लावणे तसेच बॅरिकेड्स उभारणे तसेच ‘नो सुसाईड्स’ अशा प्रकारचे फलक लावणे असे उपाय योजले जावेत.कामत यांनी निवेदनात म्हटले आहे, की गोव्यातील पूल म्हणजे आत्महत्या करण्याच्या जागा नव्हे, असा संदेश लोकांमध्ये सरकारकडून जाऊ द्या. तसेच आत्महत्या करण्याचा विचार लोकांच्या व किशोरवयीन मुलांच्या मनात येऊ नये किंवा असा विचार आल्यास त्यांना त्या विचारापासून परावृत्त करता यावे म्हणून सरकारकडून मदतवाहिनी सुरू केली जावी, तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जावे, त्यांना मानसिक स्थितीबाबतची कार्डे दिली जावीत. मानसोपचारविषयक सामाजिक कार्यक्रम सरकारने हाती घ्यावा.एक व्यक्ती आत्महत्या करायला पुलावर गेली म्हणून सावर्डे येथील एवढी मोठी दुर्घटना घडली. सरकारने सर्व पुलांचे सर्वेक्षण करावे, किती आत्महत्या कोणत्या पुलावरून झाल्या व आत्महत्या करण्याचा वेळ कोणता होता, या दृष्टीकोनातून माहिती गोळा करावी आणि त्यानुसार सर्वच पुलांवर उपाययोजना करावी, असे कामत यांनी सुचविले आहे.