शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीज नियम आयोगाशी करार का नाही? भाजपा आमदाराकडून सरकारला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:36 IST

केंद्रीय वीज नियमन आयोगाशी (जेईआरसी)गोवा सरकारने करार का केला नाही असा खडा सवाल आमदार निलेश काब्राल यांनी सरकारला घरचा अाहेर दिला. करार न केल्यामुळे जेआरसीचे प्रतिनिधीत्व गोव्याला मिळाले नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. 

पणजी: केंद्रीय वीज नियमन आयोगाशी (जेईआरसी)गोवा सरकारने करार का केला नाही असा खडा सवाल आमदार निलेश काब्राल यांनी सरकारला घरचा अाहेर दिला. करार न केल्यामुळे जेआरसीचे प्रतिनिधीत्व गोव्याला मिळाले नसल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.  गोवा सरकारने जेआरसीशी करार न केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. करार केव्हा केला जाईल असा प्रश्न त्यांनी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांना केला. परंतु या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे न दिता. मंत्र्यांनी गोव्यात स्वतंत्र आयोग स्थापन करण्याचा विचार असल्याचे वगैरे सांगितले. त्यावर समाधान न झालेले काब्राल यांनी मंत्र्यांकडून  आपल्या प्रश्नाचे सरळ उत्तर देण्यासाठी आग्रह धरला. गोव्याचा स्वतंत्र आयोग ज्यावेळी  स्थापन होईल तेव्हा होवो दे, परंतु तो पर्यंत गोव्याला आयोगाचे प्रतिनिधीत्व नको आहे काय असा त्यांचा प्रश्न होता. त्यावेळी मुखयमंत्री मनोहर पर्रीकर  यांनी  हस्तक्षेप करून तांत्रिक अडचणी त्यांना सांगितल्या. आयोगाशी करार केला तर स्वतंत्र आयोगाच्या स्थापनेला तो अडथळा ठरू शकतो का हे पडताळून पाहिले जाईल.  कायदेशीर बाजू पडताळून पाहून कराराच्या बाबतीत विचार केला जाईल असे सांगितले. वीज दरांच्या बाबतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोळशाचा मुद्दा उपस्थित करण्याची संधी सोडली नाही. ‘आम्ही गोव्यात कोळशाला विरोध करीत आहोत आणि आम्हाला वीजही स्वस्त हवी आहे. कोळसा नको असेल तर हरित ऊजेर्चा पर्याय स्वीकारावा लागेल, परंतु ही वीज खूप महाग पडणार आहे. त्यामुळे पुन्हा वीज महागली म्हणून सरकारवरच खापर फोडले जाईल’ असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा