पणजी : येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात शनिवारी सायंकाळी ‘लोकमत गोवन आॅफ द इयर’ पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ‘सुपरकॉप’ ज्युलियो रिबेरो यांना यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराने राज्यपाल मृदुला सिन्हा सन्मानित करणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक, मुंबईचे प्रसिद्ध उद्योगपती अभय लोढा आणि ‘लोकमत’च्या संपादकीय मंडळाचे चेअरमन विजय दर्डा आणि विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे प्रमुख पाहुणे असतील. पत्रकार राजदीप सरदेसाई यांना ‘गोमंतकाचा मानबिंदू’ या विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.‘गोवन आॅफ द इयर’ पुरस्कारांतर्गत आठ विभागांसाठी प्रत्येकी पाच नामांकने जाहीर करून वाचकांची मते मागविली होती. याच कार्यक्रमात विभागवार विजेते जाहीर होणार आहेत. याच सोहळ्यात ‘लोकमत’चे महिलांसाठीचे व्यासपीठ ‘सखी मंच’तर्फे आयोजित ‘सुवर्ण सखी’ योजनेचे बक्षीस वितरण होणारआहे. वामन हरी पेठे पुरस्कृत या योजनेच्या विजेत्यांना चित्रपट अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. (विशेष प्रतिनिधी)
‘लोकमत गोवन आॅफ द इयर’ पुरस्कारांचे आज वितरण
By admin | Updated: May 21, 2016 06:13 IST