शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकांचा वाद मिटला; धग कायम!

By admin | Updated: January 8, 2016 01:47 IST

फोंडा : ई-लिलाव झालेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे गेले ३६ दिवस सुरू असलेले आंदोलन गुरुवारी तात्पुरते मागे घेण्यात आले.

फोंडा : ई-लिलाव झालेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दर मागणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे गेले ३६ दिवस सुरू असलेले आंदोलन गुरुवारी तात्पुरते मागे घेण्यात आले. सेसा कंपनीने संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे शुक्रवार दि. ८ जानेवारीपासून खनिज मालाची वाहतूक सुरू करण्याचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला. मात्र, आंदोलनाच्या काळात ट्रकमालक संघटनेच्या नाकावर टिच्चून कंपनीतर्फे खनिज वाहतूक करण्यासाठी गेलेले २३१ ट्रक कायमचे बंद करावे, तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कंपनीने दाखल केलेल्या पोलीस तक्रारी ५ फेब्रुवारीला मागे घ्याव्यात; अन्यथा संघटना वाहतूक बंद पाडून पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशाराही देण्यात आला. दुपारी अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी सेसा कंपनीने ट्रकमालक संघटनेच्या सर्व मागण्या मान्य केल्यामुळे उद्या, दि. ८ जानेवारीपासून वाहतूक सुरू करत असल्याची घोषणा केली. या वेळी त्यांच्यासोबत बालाजी गावस, रमाकांत गावकर, शिवदास माडकर, जितेंद्र नाईक, भोला गावकर, शिवाजी नाईक, लक्ष्मीकांत नाईक व मोठ्या संख्येने ट्रकमालक उपस्थित होते. संघटनेतर्फे दारूकामाची आतषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला. तत्पूर्वी नीळकंठ गावस यांनी एका मराठी वृत्तपत्रात छापून आलेल्या मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. ‘ट्रकमालक संघटनेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,’ असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या जिभेला लगाम घालावा. पार्सेकरांनी मनमानी वक्तव्य करू नये. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जनतेला अपेक्षित काम करावे. ते जमत नसल्यास आपल्या पदाचा राजीनामा देऊन घरी बसावे, असा सल्लाही गावस यांनी दिला. सरकारने गोव्याला लुटण्याचा जो प्रयत्न चालविला आहे, त्याविरुद्ध संघटना नेहमीच आवाज उठवणार असून सरकारने ती दादागिरी समजावी किंवा आव्हान समजावे, असे ते म्हणाले. वास्तविक मुख्यमंत्र्यांनी या व्यवसायातील तज्ज्ञ किंवा ट्रकमालकांशी चर्चा करून दर ठरविण्याची गरज होती. मात्र, तसे न करता अमुक दरात वाहतूक करा, अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी या व्यवसायातले काहीच कळत नसल्याचे दाखवून दिल्याचा टोलाही गावस यांनी लगावला. (प्रतिनिधी)