शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून अपेक्षाभंग

By admin | Updated: May 27, 2016 02:54 IST

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली

पणजी : केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा घोर अपेक्षाभंग केला आहे. देशात पेट्रोलचे दरही कमी झाले नाही, महागाईही नियंत्रणात आली नाही व विदेशातील काळा पैसाही परत आणून तो सरकारने लोकांच्या बँक खात्यात जमा केला नाही, असे अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्र्वेदी म्हणाल्या. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांच्या उपस्थितीत येथे पत्रकार परिषदेत बोलताना चतुर्वेदी म्हणाल्या की, महागाई खूपच वाढली आहे. गेल्या दोन वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आत्महत्या केल्या. मात्र, त्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवली नाही. कोणतीच उपाययोजना केली नाही. दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा आधार होता; पण या योजनेसाठी जो निधी द्यावा लागतो तो देखील मोदी सरकारने दिला नाही. तो द्यावा अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाने सरकारला करून द्यावी लागली. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, अलीकडे काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांवेळी जरी भाजपला यश मिळाले तरी, भाजपची मतांची टक्केवारी घटली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता भाजपच्या मतांचे प्रमाण बरेच कमी झाल्याचे विधानसभा निवडणूक निकाल दाखवून देतो. आसाममध्ये पंधरा वर्षे काँग्रेसचे सरकार होते, कुठचेच सरकार सहसा सलग चौथ्यांदा निवडून येत नसते. एका वर्षांत दोन कोटी रोजगार संधी निर्माण करू, अशी ग्वाही २०१४ सालच्या निवडणुकीवेळी भाजपने दिली होती. मात्र, गेल्या दोन वर्षांत केवळ १ लाख ३ हजार एवढ्याच रोजगार संधी निर्माण झाल्या. चतुर्र्वेदी म्हणाल्या की, गोव्यातील लोकही राज्य सरकारच्या अपयशाबाबत खूप बोलत असल्याचे ऐकायला येते. (प्रतिनिधी)