शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सीआरझेडमध्ये येणा-या बांधकामांचे आता डिजिटल सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 13:41 IST

गोव्यातील किनारपट्टी भागात सीआरझेडमध्ये येणाऱ्या सर्व बांधकामांचे आता डिजिटल सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे

पणजी : गोव्यातील किनारपट्टी भागात सीआरझेडमध्ये येणाऱ्या सर्व बांधकामांचे आता डिजिटल सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार याआधी 2006- 2007 मध्ये सीआरझेड मधील बांधकामांचे सर्वेक्षण झाले होते. हा अहवाल सरकारला 2008 मध्ये प्राप्त झाला होता. हैदराबाद येथील मेसर्स रिमोट सेन्सिंग या संस्थेने हे सर्वेक्षण केले होते. आता पुन्हा किनारी भागात नव्याने सर्वेक्षण होणार आहे. 2006 च्या सर्वेक्षणात असे आढळले होते की, 1991 नंतर सीआरझेड-3 विभागात अर्थात भरती रेषेपासून 200 मीटर ते पाचशे मीटर अंतरात अनेक नवीन बांधकामे आलेली आहेत. खासकरून पेडणे तालुक्यातील हरमल,  मांद्रे, मोरजी तसेच बार्देस तालुक्यातील कळंगुट आणि कांदोळी, सासष्टी तालुक्यातील कोलवा व बाणावली, मुरगाव तालुक्यातील वेळसांव, आरोसी, केपेे तालुक्यातील नाकेरी, काणकोण तालुक्यातील खोला, अगोंदा पैंगीण, पाळोळे भागात मोठ्या प्रमाणात बांधकामं आलेली आहेत राज्यात अनेक ठिकाणी नद्यांच्या तटावर अनेक नवी बांधकामे आलेली आहेत. सीआरझेड उल्लंघनाचे बाबतीत तक्रारी बेसुमार वाढल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पर्यंत अनेक प्रकरणे पोचली आहेत. राष्ट्रीय हरित लवादाकडे अनेक प्रकरणे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता किनारी भागात नव्याने डिजिटल सर्वेक्षण करण्याचे ठरले आहे. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागात बांधकामे आढळून आल्यास अशा बांधकामांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण हायकोर्ट तसेच राष्ट्रीय हरित लवाद अनेक खटल्यांमध्ये या बांधकामावर  करडी नजर ठेवून आहे.ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम अर्थात जीपीएसद्वारे होणाऱ्या या सर्वेक्षणानंतर बांधकामांच्या बाबतीत झालेली अनेक उल्लंघने उघडकीस येणार आहेत.