शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

दिगंबर कामतना चतुर्थीपर्यंत दिलासा

By admin | Updated: September 12, 2015 02:10 IST

पणजी : जैका लाच प्रकरणात आमदार दिगंबर कामत यांना चतुर्थीपर्यंत दिलासा मिळाला आहे.

पणजी : जैका लाच प्रकरणात आमदार दिगंबर कामत यांना चतुर्थीपर्यंत दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अटकपूर्व जामिनास आव्हान देणाऱ्या याचिकेवर क्राईम ब्रँचतर्फे सरकारी वकील एस. रिवणकर यांचा युक्तिवाद शुक्रवारी अपूर्ण राहिला असून पुढील सुनावणी सोमवारी १४ रोजी दुपारी ठेवली आहे. रिवणकर यांचा युक्तिवाद मंगळवारपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर कामत यांचे वकील सुरेंद्र देसाई बाजू मांडतील. ते किमान दोन ते तीन दिवस घेतील. गुन्हेगारी खटल्याचे कामकाज दुपारनंतरच केवळ अडीच तास चालते. शिवाय, १७ ते १९ अशी तीन दिवस चतुर्थीची सुट्टी आहे. या सर्व गोष्टी कामत यांना चतुर्थीसाठी दिलासादायक ठरल्या आहेत. न्यायमूर्ती के. एल. वढाणे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. कामत यांच्याकडून तपास अधिकाऱ्यांना चौकशीत हवे तसे सहकार्य मिळालेले नाही. तसेच पोलिसांनी केलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे त्यांनी नकारार्थीच दिलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या चौकशीची गरज आहे, असा दावा रिवणकर यांनी केला. कामत यांना चौकशीसाठी २९ जुलै, ३ आॅगस्ट, १२ आॅगस्ट आणि १७ आॅगस्ट असे एकूण चारवेळा बोलावण्यात आले; परंतु त्यांनी तपास अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही. गायब असलेल्या फाईलबद्दलही त्यांच्याकडे उत्तर नव्हते. अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी नकारार्थीच दिलेली आहेत. त्यांच्या अटकेची प्रत्यक्ष वेळ आली नाही, याचा अर्थ त्यांची तपास अधिकाऱ्यांना चौकशीसाठी गरज नाही, असे होत नसल्याचे स्पष्ट करीत रिवणकर यांनी विशेष न्यायालयाच्या आदेशातील बेकायदेशीरपणावर बोट ठेवले. फौजदारी संहितेच्या कलम ४१ (अ) चा बचाव घेतला जात आहे, तो चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला. कलम ४१ हे अटक केल्यानंतर लागू होते, असे म्हणणे त्यांनी मांडले. ४१ (अ) चा बचाव खोडून काढण्यासाठी रिवणकर यांनी महाराष्ट्र वि. सुरेश पाल प्रकरणातील निवाड्याचाही हवाला दिला. दिगंबर यांनी आरटीआयखाली अर्ज करताना आमदार आणि माजी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेली लेटरहेड वापरली होती, याकडे लक्ष वेधताना राजकीयदृष्ट्या काही गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू शकतात. फाइल्सबाबत माहिती असूनही आरटीआय अर्ज करण्यात आला, असा दावा रिवणकर यांनी केला. (प्रतिनिधी)