गंगाराम म्हांबरे ल्ल पणजी पेट्रोल, डिझेलच्या किमतीत सतत होणाऱ्या वाढीचा फटका प्रत्येक नागरिकाला बसतोच. केवळ वाहनचालकांनाच नव्हे, तर वाहतुकीचा खर्च वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंचेही दर भडकल्यामुळे सामान्यांना त्याची फळे भोगावी लागतात. आखाती देशांतून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलावरच भारत देश अवलंबून असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउतारावर या देशातील इंधनाचे दर ठरतात. हे असेच चालणार आहे का? याला पर्याय नाही का? असे प्रश्न केवळ चर्चिले जातात; पण देशातच, नव्हे आपल्या राज्यात काही परिसरात अशा काही वनस्पती, झाडे आहेत, ज्यांच्यापासून डिझेल तयार केले जाऊ शकते. ही केवळ कल्पना नाही, तर प्रत्यक्षात आणता येणारी बायोडिझेल ही नवी प्रणाली आहे.
गोव्यात ‘डिझेल’चे उत्पादन शक्य
By admin | Updated: July 8, 2014 01:20 IST