शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दाबोळी व डिचोलीतून मगोच लढणार: ढवळीकर

By admin | Updated: November 16, 2016 20:50 IST

येत्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या प्रस्तावावर मगोने केलेल्या १४ जागांच्या मागणीवर सध्या बोलणी सुरू आहेत. दाबोळी आणि डिचोलीच्या जागांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही

पणजी: येत्या विधानसभा निवडणुकीत युतीच्या प्रस्तावावर मगोने केलेल्या १४ जागांच्या मागणीवर सध्या बोलणी सुरू आहेत. दाबोळी आणि डिचोलीच्या जागांच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी म्हटले आहे. या जागा मगो पक्षच लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. मगो पक्षाने दाबोळी आणि डिचोली मतदारसंघावरील आपल्या दावेदारीचा पुनरोच्चार केला आहे. कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघांच्या बाबतीत तडजोड केली जाणार नसल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नवीन इमारतीसाठी शिलान्यास केल्यानंतर आगामी निवडणुकीत मगो भाजप युती संबंधी प्रश्न विचारला असता ते बोलत होते. ते म्हणाले की दाबोळी आणि डिचोली मतदारसंघात मगोचे खूप काम आहे. मागील निवडणुकीत दाबोळी मतदारसंघात अवघ्या काही मतांनी विजयाने हुलकावणी दिली होती. यावेळी तर त्या मतदारसंघात मगोने खूपच काम केलेले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून मगोचाच उमेदवार रिंगणात असेल. या मतदारसंघातील आमदार मॉविन गुदिन्हो हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्यामुळे हा मतदारसंघ मगोला देणे भाजपला परवडेल काय असे विचारले असता ती मॉविनची समस्या असू शकते, मगोची नव्हे असे ते म्हणाले. डिचोलीतील जागेसाठीचाही आग्रह पक्षाने कायम ठेवला आहे. डिचोलीचे अपक्ष आमदार नरेश सावळ हे मगोत प्रवेश करणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले असल्यामुळे या जागेवर मगोचा दावा आहे. दाबोळी आणि डिचोली या दोन्ही मतदारसंघावर भाजपनेही दावा केला आहे. मात्र येत्या निवडणुकीत युती होणार हे मात्र निश्चित आहे. केंद्रात भाजप आघाडीचे सरकार आहे आणि गोव्यासाठी या सरकारने मोठ मोठे प्रकल्प दिलेले आहेत. भाजप - मगो युतीच्या सरकारने गोव्यात विकास केलेला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक ही युती द्वारेच लढणे हे योग्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. ह्यमडकईकरने निर्णय घ्यावाह्णकुंभारजुवे मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप आणि मगोत ओढाताण सुरू आहे. या विषयी ढवळीकर यांना विचारले असता आपण याविषयी काही बोलणे बरोबर होणार नाही असे त्यांनी सांगितले. मडकईकर यांनी कोणत्या पक्षात जावे हा निर्णय त्यांनी स्वत: घ्यायचा आहे असे ते म्हणाले. आपण याविषयी केवळ वृत्तपत्रातून वाचत असल्याचे त्यांनी सांगितले.