शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

धारगळ की म्हावळींगे हे एकदा स्पष्टच सांगा? जीसीएच्या वार्षिक सभेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमप्रश्नी १०७ क्लबांचा प्रश्न 

By समीर नाईक | Updated: October 8, 2023 19:47 IST

गोवा क्रिकेट संघटनेची (जीसीए) वार्षिक सर्वसाधारण रविवारी पर्वरीत पार पडली.

पणजी : राज्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम लवकरात लवकर व्हावे. त्यासाठी धारगळची जागा योग्य की म्हावळींगेचा प्रस्ताव याचा निर्णय सांगावा असा सवाल गोवा क्रिकेट संघटनेशी संलग्न असलेल्या १०७ क्लबनी केला. राज्यातील अन्य ठिकाणी क्रिकेटसाठी आवश्यक साधनसुविधा उभारण्यावर जीसीएने भर द्यावा, अशी सूचना क्लबनी केली.

गोवा क्रिकेट संघटनेची (जीसीए) वार्षिक सर्वसाधारण रविवारी पर्वरीत पार पडली. १०७ क्लबांच्या प्रतिनिधींची यावेळी उपस्थिती होती. व्यासपीठावर जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव रोहन गावस देसाई आणि खजिनदार दया पागी उपस्थित होते. सभेत मागील सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून तो मंजूर करून घेण्यात आला. दरम्यान, क्लबांनी धारगळ आणि म्हावळींगे येथील क्रिकेट स्टेडियमसंबधी प्रश्न उपस्थित केला. दोन्हीपैकी कोठे जागा निश्चित होणार आणि कधी उभारणी होणार याविषयी जीसीएने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी क्लबनी केली. त्यावर अध्यक्ष विपुल फडके यांनी जेथील प्रक्रिया लवकर पूर्ण होईल, तेथेच स्टेडिमय उभारले जाईल, असे सांगितले. 

 स्टेडियमच्या प्रक्रियेबाबत अहवाल द्यावा स्टेडियमबाबत जीसीए कुठली प्रक्रिया करत आहे किंवा त्याच्याशी संबधीत संघटनेने कुठला निर्णय घेतला, याची माहिती क्लबना असणे आवश्यक आहे. त्यामुळे निदान महिन्यातून एकदा जीसीएने स्टेडियमबाबतच्या प्रक्रियेची माहिती क्लबना पुरवावी, अशी मागणी प्रतिनिधींनी संघटनेकडे केली. 

 स्टेडियमसाठी खास आमसभा घ्या रविवारी झालेल्या आमसभेच्या अजेंडामध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा विषय नव्हता. तरीही सदस्यांनी या विषयावरुन जीसीएसमोर प्रश्न उपस्थित केले. स्टेडियमच्या जागा निश्चितीबाबत राज्यात गोंधळाची स्थिती आहे. धारगळ की म्हावळींगे हे जीसीएने स्पष्ट करावे. फक्त स्टेडीयमबाबत चर्चेसाठी जीसीएने खास आमसभा आयोजित करावी, अशी मागणी क्लबनी केली.

स्टेडियमसाठी धारगळची जागा योग्य - विपुल फडके जीसीएकडे धारगळ आणि वन म्हावळिंगे येथेे स्वत:ची जागा आहे. त्यामुळे दाेन्ही ठिकाणी क्रिकेटसाठी आवश्यक साधनसुविधा तयार करण्यावर आम्ही भर देणार आहोत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या अनुषंगाने विचार केल्यास धारगळ येथील जागेवर प्रक्रियेला यापूर्वीच सुरुवात करण्यात आली होती. अनेक परवाने आम्हाला या जागेसाठी मिळाले आहेत. त्यामुळे शक्यतो धारगळ येथेच स्टेडियम उभारण्याचा जीसीएचा विचार आहे, असे प्रतिपादन जीसीएचे अध्यक्ष विपुल फडके यांनी केले.

अध्यक्ष फडके म्हणाले की, धारगळ येथे स्पोर्ट्स सिटी व्हावी असे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. त्यांनी असोसिएशनकरिता जमीन उपलब्ध करून दिली. पेडणे मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. येथे विमानतळ आला आहे. चांगला महामार्ग तयार झाला आहे. तसेच मोठमोठी हॉटेल्स येथे आली आहेत. त्यामुळे येथे सहज सुविधा उपलब्ध होतील. बीसीसीआयदेखील या सर्व गोष्टींचा विचार करत संघटनेला सामने देत असते,’ असेही फडके यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :goaगोवा