शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मूत्रपिंड विभाग निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 01:54 IST

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील (गोमेकॉ) मूत्रपिंड विभागच (नेफ्रोलॉजी) निकामी झाला आहे. या विभागाचे

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील (गोमेकॉ) मूत्रपिंड विभागच (नेफ्रोलॉजी) निकामी झाला आहे. या विभागाचे प्रमुख डॉ. तिवारी आणि डॉ. अमोल म्हालदार या दोघांनीही गोमेकॉला रामराम ठोकल्यानंतर सरकारने किंवा गोमेकॉ व्यवस्थापनाने पर्यायी व्यवस्थाच केली नाही. परिणामी किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया अडून राहिल्या आहेत.गोमेकॉत यापूर्वी किडनी रोपणाच्या १३ ते १४ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. गेल्या दोन वर्षांत तेरा-चौदा पुरुष व महिलांना तसेच युवकांनाही गोमेकॉत किडनी रोपण करून घेता आले. प्रारंभी एक-दोन शस्त्रक्रियांवेळी मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टर आणले गेले व किडनी रोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले गेले. नंतरच्या सर्व शस्त्रक्रिया गोव्यातीलच डॉक्टरांनी केल्या. त्या यशस्वीपणे पार पडल्याचे श्रेय सरकारने घेतले. आरोग्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही संबंधित डॉक्टरांचे यापूर्वी कौतुक केले आहे; पण नेफ्रोलॉजी विभागच आता नेस्तनाबूत झालेला असून हा विभागच शिल्लक राहिलेला नाही, याची गंभीर दखल अजूनही सरकारने घेतलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.किडनी रोपणाच्या शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी अगोदर नेफ्रोलॉजी विभाग योग्य स्थितीत असणे गरजेचे असते. डॉ. तिवारी आणि डॉ. अमोल म्हालदार यांनी गोमेकॉच्या सेवेचा निरोप घेतल्यानंतर हा विभागच अस्तित्वहीन झाला. त्या विभागातील महत्त्वाची पदे रिकामी होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था करायला हवी होती. संबंधितांचे राजीनामे स्वीकारून त्यांना सेवामुक्त करण्यापूर्वीही पर्यायी व्यवस्था झाली नाही आणि नंतरही पदे भरण्यासाठी जलदगतीने पावले उचलली गेली नाहीत. जर पदे भरली असती, तर किडनी रोपणाच्या आणखीही शस्त्रक्रिया एव्हाना झाल्या असत्या, असे सूत्रांनी सांगितले. दोन-तीन महिन्यांपासून ही पदे रिक्त आहेत. (खास प्रतिनिधी)