शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा प्रश्न मांडला राष्ट्रपतींसमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:05 IST

गोव्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करायला हवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर मांडली.

पणजी : गोव्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये (एसटी) समावेश करायला हवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासकांच्या शिष्टमंडळाने शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासमोर मांडली. राजभवनवर कवळेकर यांनी डॉ. नंदकुमार कामत, वाघा मिसाळ, डॉ. रजन लंबोर, मनिष लंबोर, बी. डी. मोटे व गंगाराम एडगे यांच्यासोबत राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली.राष्ट्रपती गोवा भेटीवर आलेले असल्याने त्यांना गोव्यातील धनगर समाजाची मागणी सविस्तरपणे कळावी या हेतूने शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. संसदेसमोर सध्या देशातील आठ राज्यांमधील काही समाजांना एसटींचा दर्जा देण्याचे विधेयक आहे. त्यात गोव्यातील धनगर समाजाचाही समावेश केला जावा, असा मुद्दा शिष्टमंडळाने राष्ट्रपतींसमोर मांडला. धनगर समाजाचा एसटींमध्ये समावेश करण्यास आता योग्य संधी आहे. यापूर्वी गावडा, कुणबी व वेळीप या गोव्यातील तीन समाजांचा समावेश झाला पण धनगर समाजाचाच समावेश झाला नाही. हा समावेश झाला तर धनगर समाजाच्या विकासाला वेग प्राप्त होईल, असे कवळेकर म्हणाले.यापूर्वी नंदकुमार कामत यांच्या समितीने धनगर समाजाच्या विषयाचा अभ्यास केलेला आहे. कामत यांनी धनगर समाजाची गोव्यातील सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्थिती याविषयी सविस्तर माहिती राष्ट्रपतींना दिली. धनगर समाजाचा एसटींमध्ये समावेश होण्याची प्रक्रिया आतार्पयत का अडली तसेच सध्या हा विषय कुठे पोहचला आहे याविषयी कामत यांनी राष्ट्रपतींना माहिती दिली. धनगर समाजाचा यापूर्वीच एसटींमध्ये समावेश व्हायला हवा होता असा मुद्दा त्यांनी मांडला. राष्ट्रपतींनी घटनेच्या चौकटीत राहून आपण यावर विचार करीन, अशी ग्वाही दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना निवेदन सादर केले.उटाचेही निवेदनदरम्यान, उटा संघटनेच्या शिष्टमंडळानेही स्वतंत्रपणो राष्ट्रपतींची भेट घेतली. अध्यक्ष नामदेव फातर्पेकर, मंत्री गोविंद गावडे, माजी मंत्री प्रकाश वेळीप आदींनी राष्ट्रपतींसमोर उटाच्या ज्या तीन मागण्या प्रलंबित आहेत, त्या नव्याने मांडल्या. केंद्र सरकारसमोर यापूर्वी या मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. अनुसूचित जमातींसाठी गोवा विधानसभेचे मतदारसंघ लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षित केले जावेत अशी प्रमुख मागणी राष्ट्रपतींसमोर मांडण्यात आली. तसेच पंचायत क्षेत्रत एसटींची चार हजार लोकसंख्या असल्यास ते पंचायत क्षेत्र शेडय़ुल्ड क्षेत्र म्हणून राष्ट्रीय स्तरावर जाहीर केले जाते. गोव्यासाठी लोकसंख्येचे हे प्रमाण पंचायतींसाठी चार हजारऐवजी कमी धरले जावे अशीही मागणी राष्ट्रपतींसमोर ठेवली गेली. वननिवासी हक्क कायद्याच्या कार्यवाहीत येणारी अडचणही राष्ट्रपतींसमोर मांडली गेली. आपण घटनेतील तरतुदींशी बांधिल आहोत. आपण तरतुदींनुसार या विषयाचा अभ्यास करीन, अशी ग्वाही राष्ट्रपतींनी दिली.