शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनो बंद करण्याच्या मागणीवर विचार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:23 IST

मांडवीतील कॅसिनो लोकांना नको असल्याने ते बंद करण्याची मागणी प्रदेश भाजपने मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर ठेवली असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी केले होते.

पणजी : मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो बंद करण्याची जी मागणी भाजपने माझ्यासमोर आणली आहे, त्या मागणीवर सरकार विचार करील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मांडवीतील कॅसिनो लोकांना नको असल्याने ते बंद करण्याची मागणी प्रदेश भाजपने मुख्यमंत्री सावंत यांच्यासमोर ठेवली असल्याचे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी मंगळवारी केले होते. पणजीतील कॅसिनोंचा विषय हा निवडणुकीत तापलेला आहे. काँग्रेस पक्ष, गोवा सुरक्षा मंच व आम आदमी पक्षानेही कॅसिनोंचा मुद्दा हाती घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर बुधवारी पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना तेंडुलकर यांच्या विधानाविषयी विचारले. कॅसिनो बंद करण्याची मागणी तुमच्यार्पयत आली आहे काय असे विचारताच मुख्यमंत्री म्हणाले, की मागणी बुधवारीच आपल्यार्पयत पोहचली आहे. बुधवारी भाजपचे निवेदन पोहचले आहे. आपण त्यावर यापुढे विचार करीन. आपण अजून विचार केलेला नाही. कॅसिनो बंद करायचे की काय करायचे ते विचारानंतर सरकार ठरवील.

त्या मुलीचा शोध दरम्यान, बाबूश मोन्सेरात बलात्कार प्रकरणी जी मुलगी आश्रमातून गायब झाली आहे, तिचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहे. चौकशी काम सुरू झाले आहे. ती बेपत्ता झाली की तिचे कुणी अपहरण केले की आणखी काय घडले याबाबतचे सत्य लवकरच लोकांना कळून येईल. मी रोज त्याविषयीची माहिती चौकशी यंत्रणोकडून घेत आहे. ती मुलगी ज्या आश्रमात राहत होती, त्या आश्रमातील लोक, ती जिथे शिकत होती, तेथील शिक्षक आणि अन्य घटक यांच्यार्पयत चौकशी यंत्रणा पोहचेल. तिचा शोध घेतलाच जाईल. सरकारची ती जबाबदारी आहे व सरकार जबाबदारी पार पाडत आहे. सत्य काय आहे ते लपून राहणार नाही. मुलीचा शोध लागल्यानंतर सगळे सत्य लोकांसमोर आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.