शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘जैका’ची कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब

By admin | Updated: August 4, 2015 02:37 IST

पणजी : ‘जैका’ची कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब झाला. २००६ पासून २०१० पर्यंत काहीच कामे झाली नाहीत. वन खात्याचे ना हरकत दाखले मुदतही संपल्याने नवीन द्यावे लागले,

पणजी : ‘जैका’ची कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब झाला. २००६ पासून २०१० पर्यंत काहीच कामे झाली नाहीत. वन खात्याचे ना हरकत दाखले मुदतही संपल्याने नवीन द्यावे लागले, असे बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत स्पष्ट केले. मात्र, लुईस बर्जर लाच प्रकरणाबाबत व तत्संसंबधी होत असलेल्या आरोपांवर कोणतेही भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. बांधकाम खात्याच्या अनुदान मागण्यांवर चर्चेत आमदार माविन गुदिन्हो मंत्र्यावर तुटून पडले. ‘जैका’च्या कामात आजही भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर कोणतेही उत्तर देण्याचे ढवळीकर यांनी टाळले. ढवळीकर म्हणाले, ‘जैका’च्या कोणत्याही कामात व्यत्यय आलेला नाही. कामे देण्यास ४ वर्षांचा विलंब झाल्याने साहजिकच खर्च वाढला. पूर्वीच्या सरकारमधील बांधकाममंत्र्यांनी जी कामे लाटली त्यातील ४० कोटी रुपये खर्च कमी करून घेतला आणि तिजोरीत त्याचा फायदा केला. पाण्याचा महसूल ८४ कोटींवरून १२० कोटी रुपयांवर पोचला आहे. पाणी गळतीचे प्रमाण ४० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे ते म्हणाले. पाण्याचे दर वाढले असले तरी त्याचा मर्यादित पाणी वापर करणाऱ्या मध्यमवर्गीयांना कोणताही फटका बसणार नाही. याची काळजी सरकारने घेतली असल्याचा दावा ढवळीकर यांनी केला. अन्य राज्यांच्या तुलनेत येथे दर कमी आहेत. १५ क्युबिक मीटरपर्यंत केवळ अडीच रुपये दर आहे. जास्त पाणी वापरल्यास जास्त बिल भरावे लागेल. जुवारी पुलाच्या पायाभरणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले जाणार आहे. १९ डिसेंबर ही तारीख तूर्त निश्चित असली तरी त्यांना त्याआधी आणणे शक्य असेल तर मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असे ढवळीकर म्हणाले. आमदार सुभाष फळदेसाई यांनी आक्रमक होत सांगेतील लोकांची मंत्र्यांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप केला. साळावलीच्या पाण्यात मॅगनिजचे प्रमाण लक्षणीय आढळले याबाबत ढवळीकर म्हणाले की, १०० एमएलडीचा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक फिल्टरिंगचे ५२ कोटीचे काम हाती घेतले जाईल. (प्रतिनिधी)