शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दाम्पत्याचा खून : परप्रांतीयांची चौकशी

By admin | Updated: September 19, 2015 02:01 IST

पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील रेजिनाल्ड गुदिन्हो (७५) आणि त्यांची पत्नी जे.सी. गुदिन्हो (७०) या दोघांचा अज्ञातांनी कोयत्याने वार करून निर्घृणरित्या खून करण्यात आला.

पेडणे : तळेवाडा-धारगळ येथील रेजिनाल्ड गुदिन्हो (७५) आणि त्यांची पत्नी जे.सी. गुदिन्हो (७०) या दोघांचा अज्ञातांनी कोयत्याने वार करून निर्घृणरित्या खून करण्यात आला. या घटनेने धारगळ गावाबरोबरच पेडणे तालुका हादरला आहे. गुरुवारी (दि. १७) पहाटे ही घटना घडली. दरम्यान, हे खून प्रकरण कोणत्या कारणावरून घडले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुदिन्हो कुटुंबीय २५ ते ३० वर्षांपासून तळेवाडा-धारगळ येथे राहात होते. १७ रोजी चतुर्थीदिवशी अशोक आरोंदेकर हा सकाळी साडेनऊच्या सुमारास दूध घेऊन आला, तेव्हा त्यांच्या घरी भले मोठे दोन कुत्रे होते. त्यामुळे तो थेट आत जायला घाबरला. त्याने शेजारी राहणाऱ्या कामगाराला हाक मारली आणि दोघांनी घरात प्रवेश केला. त्या ठिकाणी सर्वत्र रक्त पडल्याचे भयानक दृश्य त्यांनी पाहिले. घर सताड उघडे होते. त्यांनी त्वरित या घटनेची माहिती पेडणे पोलिसांना दिली. रेजिनाल्ड गुदिन्हो हे मूळचे बस्तोडा, बार्देस येथील रहिवासी. २५ ते ३० वर्षांपूर्वी त्यांनी धारगळ येथे जमीन विकत घेऊन दूध उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्याकडे बिगरगोमंतकीय कामगार होते आणि अद्यापही आहेत. अनेकजण चालक म्हणून कामाला होते आणि नोकरी सोडून गेले. रेजिनाल्ड हे विदेशात नोकरी करायचे. गावात त्यांचे कुणाकडेही येणे-जाणे नव्हते. ते सतत कामात व्यस्त असत. या दाम्पत्याचा खून केल्याची तक्रार अशोक आरोंदेकर यांनी दिली होती. त्यानंतर पेडणे पोलिसांनी संशयितांच्या विरोधात भारतीय दंडसंहिता कलम ४४९, २०३ या कलमांखाली गुन्हा नोंदवला. पेडणे पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड, म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, हणजूण पोलीस निरीक्षक पंकज नाईक या प्रकरणाचा तपास करत आहेत. निरीक्षक गाड यांनी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना बोलावून काही पुरावे मिळतात का, याचा शोध घेतला. पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवताच डीआयजी रंगनाथन, पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. (प्रतिनिथी)