पणजी : मटका प्रकरणात दैनिक पुढारीने दिलेल्या स्पष्टीकरणावर क्राईम ब्रँचचे समाधान न झाल्यामुळे या दैनिकाच्या गोव्यातील निवासी संपादकांना रितसर समन्स बजावण्याचा निर्णय क्राईम ब्रँचने घेतला आहे. मटका प्रकरणात दैनिक पुढारी व दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. सीआरपीसी कलम ९१ अंतर्गत या दोन्ही दैनिकांना क्राईम ब्रँचकडून पत्रे पाठविण्यात आली होती. मटका प्रकरणात माहिती देण्याची मागणी त्यात करण्यात आली होती. तांत्रिक कारण पुढे करून दैनिक पुढारीने एकदा माहिती देण्याचे टाळले होते; परंतु पोलिसांच्या दुसऱ्या पत्राला त्यांना उत्तर द्यावेच लागले. काही दिवसांपूवी या दैनिकाच्या निवासी संपादकांकडून क्राईम ब्रँचला पत्र लिहून स्पष्टीकरण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या पत्रात दिलेली माहिती आणि पोलिसांनी मागितलेली माहिती यात काहीच संबंध नसल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सीआरपीसी कलम ४१ अंतर्गत दैनिक पुढारीच्या निवासी संपादकांच्या नावे समन्स बजावण्यात येणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली. (पान २ वर)
‘पुढारी’च्या सफाईवर क्राईम ब्रँच असमाधानी
By admin | Updated: November 2, 2015 02:30 IST