शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मंत्र्यांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: July 22, 2015 01:23 IST

पणजी : जैका प्रकल्प-लुईस बर्जर लाचप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) काही मंत्री व लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र

पणजी : जैका प्रकल्प-लुईस बर्जर लाचप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) काही मंत्री व लुईस बर्जर इंटरनॅशनल कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदविला. मात्र, त्या मंत्र्यांच्या नावांचा उल्लेख टाळण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यापूर्वी सीआयडीच्या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी प्रधान अभियंते आनंद वाचासुंदर यांची तीन तास कसून चौकशी करण्यात आली. ‘जैका’च्या गोव्यातील प्रकल्पात सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या लुईस बर्जर कंपनीने गोव्यातील माजी मंत्र्याला कंत्राट मिळविण्यासाठी लाच दिल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर या प्रकरणात तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. सीआयडीकडून या प्रकरणी भारतीय दंड संहितेतील भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात वाचासुंदर यांची तीन तास चौकशी करतानाच त्यांच्याकडून महत्त्वाची माहितीही सीआयडीने मागवून घेतली. ‘जैका’कडून गोव्यात एकूण किती कामे करण्यात आली आहेत किंवा करण्यासाठी देण्यात आली आहेत आणि या संबंधीच्या कंत्राट प्रक्रियेत कोणते अधिकारी सहभागी होते, ही माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली. या संबंधीच्या सर्व फाईल्स व कागदपत्रे घेऊन त्यांना सीआयडीकडून बोलावण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी ते सीआयडीच्या कार्यालयात हजर राहिले. रात्री उशिरापर्यंत ते सीआयडीच्या रायबंदर येथील कार्यालयात होते. अधीक्षक कार्तिक कश्यप यांच्या उपस्थितीत इतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली व नंतर गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)