शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कॅसिनो परवान्याच्या नूतनीकरणाच्या प्रकरणी न्यायालयाची सरकारला नोटीस

By admin | Updated: October 27, 2016 15:42 IST

मांडवितील सहाव्या कॅसिनो परवान्याच्या नूतनीकरणाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सरकारला आणि गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडला नोटीसा बजावल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 27 : मांडवितील सहाव्या कॅसिनो परवान्याच्या नूतनीकरणाच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने सरकारला आणि गोल्डन ग्लोब हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेडला नोटीसा बजावल्या आहेत. हरियानाचे माजी मुख्यमंत्री गोपाल कांदा यांच्या मालकीच्या गोल्डन ग्लोब हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडच्या आॅफ शोर कॅसिनोला परवानगी देण्यास हरकत घेणारी याचिका समाज कार्यकर्ते आयरीश रॉड्रिगीश यांनी दाखल केली होती. ही याचिका गुरुवारी न्याय एफ एम रेईश आणि नूतन सरदेसाई यांच्या द्वीसदस्यीय खंडपीठापढे सुनावणीस आली होती. खंडपीठाने राज्याच्या मुख्यसचिवांना या प्रकरणात नोटीस बजावली आहे. तसेच गोल्डन ग्लोब हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडलाही नोटीस बजावली आहे. या प्रकरणात स्पष्टीकरण देण्यासाठी सरकारकडून वेळ मागितल्यामुळे दिवाळीच्या सुट्टीपूर्वी या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे. १ आॅगस्ट २०१६ रोजी अतिरिक्त अ‍ॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी न्यायालयात कॅसिनो संबंधी केलेले वक्तव्य दिशाभूलकारक असल्याचे रॉड्रिगीश यांनी याचिकेत म्हटले आहे. ७ डिसेंबर २०१५ रोजी गृहखात्याच्या अवर सचिवांनी न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रकात मूदत संपलेल्या परवावन्यांचे पुन्हा नुतनीकरण करण्यात येणार नाही असे म्हटले होते. याकडे रॉड्रिगीश यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्याच प्रमाणे २०१४ साली मूदत संपलेल्या कॅसिनोंच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याच्या गोवा मंत्रीमंडळाच्या निर्णयाकडेही न्यायालयाचे त्यांनी लक्ष वेधले.