शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टी-शर्टचा खर्च सरकारी निधीतून नको

By admin | Updated: February 6, 2016 03:05 IST

मडगाव : येथील कार्निव्हल मिरवणुकीसाठी ‘माडांचे संवर्धन करा’ अशा आशयाचा संदेश देणारे टी-शर्ट सध्या वादाचा विषय बनला असून

मडगाव : येथील कार्निव्हल मिरवणुकीसाठी ‘माडांचे संवर्धन करा’ अशा आशयाचा संदेश देणारे टी-शर्ट सध्या वादाचा विषय बनला असून या टी शर्टवरील मजकूर सरकारी धोरणाच्या विरोधात असल्याने या टी शर्ट्सचा खर्च सरकारी अनुदानातून करू नका, अशी सूचना मुख्याधिकारी सिध्दिविनायक नाईक यांनी नगराध्यक्षा बबिता प्रभूदेसाई यांना केली आहे. या पार्श्वभूमीवर फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी कार्निव्हल समितीचे कार्यकारी अध्यक्ष टिटो कार्दोज यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकार माडांच्या विरोधात आहे का, असा सवाल केला आहे. जर तसे असेल तर सरकारने स्पष्ट करावे, असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे. ‘माड वाचवा-गोवा वाचवा’ अशा आशयाचा संदेश असलेले टी-शर्ट घालून नगरसेवकांनी कार्निव्हलची पत्रकार परिषद घेतली होती. याचा उल्लेख मुख्याधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात केला आहे. हा संदेश सरकारी धोरणाच्या विपरीत असून अशा आशयाची कृती आयोजनात करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. कार्निव्हलात माडाचे राजकारण आणल्याचा दावा करून या मिरवणुकीला दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करावे, अशी मागणी फातोर्ड्याचे माजी आमदार दामू नाईक यांनी गुरुवारी केली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, निर्वाणा कंपनीकडून तयार करून घेतलेल्या या टी-शर्ट्ससाठी आयोजकांना दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सरदेसाई व कार्दोज यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माडांना वाचवा हा संदेश पर्यावरण बचावार्थ दिला असून या संदेशाची सरकारला भीती वाटते का, असा सवाल केला. जोपर्यंत सरकार माडाला ‘गवत’ करण्याची दुरुस्ती मागे घेत नाही तोपर्यंत प्रत्येक व्यासपीठावर गोव्याचा हा ज्वलंत प्रश्न आणला जाईल, असेही सरदेसाई यांनी सांगितले. केवळ कार्निव्हल मिरवणुकीमध्येच नव्हे तर आगामी शिगम्याच्या मिरवणुकीवेळीही आम्ही माडाचा प्रचार करू, असे सरदेसाई म्हणाले. माडाच्या बचावासाठी लवकरच माड अभियान हाती घेण्यात येणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. शनिवारी वुई फॉर फातोर्डा या संघटनेमार्फत कार्निव्हल नृत्य रजनी आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमातही ‘माड संवर्धन’ हीच मुख्य संकल्पना असेल, असे त्यांनी सांगितले. या नृत्य रजनीच्यावेळी माडावर आधारित वेशभूषेला खास बक्षिसे देण्यात येतील, असे सरदेसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)