शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनच्या १२ दिवसांत गोव्यात अडकलेल्या २९९४ विदेशी पर्यटकांना पाठवले मायदेशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 20:29 IST

लॉकडाऊनच्या १२ दिवसांच्या (२५ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत) काळात दाबोळी विमानतळावरून २९९४ विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असून यात ३१ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहीती उपलब्ध झाली आहे.

वास्को: लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याकरिता दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने १२ दिवसात उत्तम पावले उचलून २९९४ विविध राष्ट्रातील पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवले. २५ मार्च ते ५ एप्रिल अशा १२ दिवसात दाबोळी विमानतळावर १८ खास विमाने आल्यानंतर यातून या विदेशी प्रवाशांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले आहे. ८ एप्रिल रोजी अन्य एक खास विमान दाबोळी विमानतळावर आल्यानंतर यातून गोव्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या युनियटेड किंगडमच्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याची माहिती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.लॉकडाऊननंतर गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना सुखरूपरीत्या त्यांच्या मायदेशी पाठवण्याकरिता दाबोळी विमानतळ प्राधिकरणाने उत्तम अशी पावले उचलली. लॉकडाऊनच्या १२ दिवसांच्या (२५ मार्च ते ५ एप्रिल पर्यंत) काळात दाबोळी विमानतळावरून २९९४ विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले असून यात ३१ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. गोव्यातून १८ खास विमानाने मायदेशी पाठवण्यात आलेल्या प्रवाशात इस्त्राएल, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, रशिया, स्पेन, स्वित्झर्लंड, इटली, स्वीडन, कझाकिस्तान अशा विविध राष्ट्रातील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली.लॉकडाऊनमुळे अडकलेल्या पर्यटकांना मायदेशी पाठवण्यात येत असताना कोरोना विषाणूची पसरण होऊ नये तसेच सर्वांना या विषाणूपासून दूर ठेवण्याकरिता दाबोळी विमानतळावर कडक सुरक्षेची पावले उचलण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आपल्या मायदेशी जाण्याकरिता विदेशी पर्यटक दाबोळी विमानतळावर आल्यानंतर विमानात पोहोचेपर्यंत योग्यरीत्या सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिग) पाळण्याची पावले विमानतळावर उचलण्याबरोबरच इतर विविध सुरक्षेची पावले उचलण्यात आल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली.लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकलेल्या बहुतेक विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले असले तरी काही पर्यटक अजूनही गोव्यात असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी मागच्या १२ दिवसात विमानतळ प्राधिकरणाने विविध पावले उचलून २९९४ पर्यटकांना त्यांच्या राष्ट्रात पोहोचवल्याचे सांगितले. लॉकडाऊनमुळे अन्य काही विदेशी पर्यटक अजून गोव्यात अडकून असल्याची माहिती गगन मलिक यांनी देऊन त्यांना सुद्धा मायदेशी पाठवण्यासाठी लवकरच उचित पावले उचलण्यात येणार असल्याचे मलिक यांनी माहितीत सांगितले. ८ एप्रिल रोजी अन्य एक खास विमान गोव्यात येणार असून या विमानातून गोव्यात अडकून असलेल्या युनियटेड किंगडम च्या काही पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याची माहिती संचालक गगन मलिक यांनी शेवटी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा