शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : मोतीडोंगर मांगोर हिलच्या दिशेने? 15 जण पॉझिटिव्ह, कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 22:18 IST

मांगोर हिलची पुनरावृत्ती मडगावात तर होणार नाही ना या भीतीने मडगावकराना ग्रासले आहे.

ठळक मुद्देशनिवारी या वस्तीत एक 75 वर्षीय वृद्ध पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर रविवारी त्याच्याच घरातील आणखी चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या.

मडगाव: मडगावच्या मोती डोंगरावर कोरोनाच्या रुग्णांची संख्या सोमवारी सकाळपर्यंत 15 वर पोहोचल्याने संपूर्ण मडगाव भयभीत झाले असून ही झोपडपट्टी त्वरित कंटेन्मेंट झोन जाहीर करा अशी मागणी वाढू लागली आहे. मडगावातील नगरपालिकेच्या कामगारांसह बहुतेक कामगार याच वस्तीत राहत असल्याने ही लोकांमधली भीती अधिकच वाढली आहे. मांगोर हिलची पुनरावृत्ती मडगावात तर होणार नाही ना या भीतीने मडगावकराना ग्रासले आहे.

शनिवारी या वस्तीत एक 75 वर्षीय वृद्ध पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर रविवारी त्याच्याच घरातील आणखी चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या. त्यानंतर या भागातील लोकांच्या मोठय़ा प्रमाणात चाचण्या घेतल्या असता सोमवारी या व्यक्तीच्या शेजारी राहणारे आणखी 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात त्या व्यक्तीच्या शेजारच्या घरातील 6 व्यक्तींचा समावेश होता.

या झोपडपट्टीत अगदी एकमेकांना लागून घरे असल्यामुळे या वस्तीत हे संक्रमण वेगाने पसरू शकते. मडगावच्या बहुतेक घरातील कामवाल्या या वस्तीतल्या आहेत. त्याशिवाय दुकाने, इतर व्यवसायातील कामगारही याच वस्तीत राहतात. मडगावात घरोन्घर जाऊन कचरा उचलणारे पालिकेचे कामगारही बहुतेक याच वस्तीत राहत असल्याने  वेळीच आळा घातला नाही तर हे संक्रमण मडगावात इतर ठिकाणीही पसरू शकते ही भीती लोकांमध्ये त्यामुळेच पसरली आहे. सध्या या झोपडपट्टीकडे जाणा-या तिन्ही वाटा पोलिसांचा बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आल्या असून या वस्तीतल्या लोकांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.

अन्यथा मांगोर हिल सारखी स्थितीमोती डोंगरावरील स्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित पाऊले उचलून ही संपूर्ण झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याची गरज मोती डोंगराच्या पायथ्याशी राहणारे भाई नायक यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, वास्को प्रमाणोच येथेही कामगार वस्ती आहे. पालिकेत या वस्तीतील कित्येकजण सफाई कामगार म्हणून काम करतात. वास्को येथील नगरसेवकांचा या कामगारांशी संपर्क आल्याने नगरसेवक बाधित झाले आहेत त्यामुळे मडगावात उपाय घेतले नाहीत तर जे वास्कोत घडले तेच मडगावातही घडू शकते असे ते म्हणाले. दरम्यान भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांना लक्ष्य केले असून त्यांच्या दबावामुळेच प्रशासन हा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करत नाही असा आरोप चंदन नायक यांनी केला आहे.

कंटेन्मेंट झोन रोखणारा मी कोण?भाजपाने दिगंबर कामत यांना लक्ष्य केले असल्याच्या पार्श्वभूमीवर कंटेनमेंट झोन करण्यापासून प्रशासनाला रोखणारा मी कोण असा सवाल कामत यांनी केला आहे. ते म्हणाले, असे निर्णय आमदार नव्हे तर जिल्हा प्रशासन घेते. मी सरकारातही नाही मग माङयावर आरोप का असा सवाल त्यांनी केला. मोती डोंगरावरील संक्रमण इतर भागात पोहोचू नये यासाठी प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. या वस्तीच्या तिन्ही वाटा बंद केल्या आहेत. रविवारी स्थानिकाबरोबर बैठक घेऊन कुणी घरातून बाहेर पडू नये असे त्यांना सांगितले आहे. चाचण्याही सुरू केल्या आहेत असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवा