शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन, मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 20:06 IST

144 कलम हे राज्य कोरोनामुक्त होईपर्यंत कायम असावे, असेही मंत्रिमंडळाने ठरविले असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे.

पणजी : राज्यात सध्या असलेले लॉकडाऊन यापुढेही सुरू ठेवावे की नाही याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे येत्या 13 रोजी आपला निर्णय जाहीर करतील. तथापि, गोवा मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकी वेळी सर्वच मंत्र्यांनी येत्या 30 पर्यंत लॉकडाऊन असावे अशी भूमिका घेतली. मॉल्स, कॅसिनो, रेस्टॉरंट्स तर सुरू होऊच नयेत व राज्याच्या सीमा बंदच राहायला हव्यात यावरही मंत्र्यांचे एकमत झाले. राज्यात 144 कलम हे गोवा कोरोनामुक्त होईपर्यंत कायम असावे, असेही मंत्रिमंडळाने ठरविले असल्याचे मंत्र्यांचे म्हणणे आहे.मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या चर्चेविषयी व मंत्र्यांनी केलेल्या सूचनांविषयी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माहिती दिली. पावसाळ्य़ात कोरोना विषाणू कसा वागेल ते कुणीही सध्या सांगू शकत नाही. गोव्याने त्यामुळे काळजी घ्यावीच लागेल, असे मंत्री राणे म्हणाले. लॉकडाऊन येत्या 30 पर्यंत कायम असावा, सोशल डिस्टन्सिंग सांभाळून सरकारी व खासगी कामे सुरू करता येतील, पण सामूहिक एकत्रीकरण केले जाऊ नये, अशा प्रकारच्या सूचना बहुतेक मंत्र्यांनी बैठकीत केल्या. राज्याच्या सीमा सध्या सील आहेत. त्या सीमा यापुढील काळातही सील असायला हव्यात, असे राणे म्हणाले. विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही अशा प्रकारचीच माहिती पत्रकारांना दिली. जर यापुढे विमाने सुरू झाली तर विमानतळांवर व रेल्वे स्थानकांवर कायम चाचणी व्हावी. तसेच जे प्रवासी गोव्यात येतात त्यांच्याकडून कोरोनामुक्त असल्याचे प्रमाणपत्र घेतले जावे, असे मंत्री राणे व लोबो म्हणाले.मी सर्व मंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. पंतप्रधान मोदी यांना मी गोवा सरकारची भूमिका अगोदर कळवेन व मग येत्या 13 रोजी ती भूमिका गोव्याच्या जनतेसाठी जाहीर करीन. येत्या 11 रोजी मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सही होणार आहे. गोव्यातील कोणत्या सेवा सुरू राहतील व लॉकडाऊन किती काळ चालेल, याविषयी आपण 13 रोजी भाष्य करेन, असंही मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या