शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : 33 टक्के कर्मचाऱ्यांसह सरकारी कार्यालये सोमवारपासून पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:12 IST

coronavirus : सरकारी कर्मचा-यांनी कार्यालयात यावे म्हणून कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पणजी : सरकार सोमवारपासून लॉकडाऊनचे निकष थोडे शिथिल करत आहे. केंद्रीय गृह मंत्रलयाच्या सूचनेनुसार काही व्यवसाय व व्यवहार सोमवारपासून सुरू होतील. विशेष म्हणजे 33 टक्के सरकारी कर्मचारी सोमवारपासून कार्यालयात उपस्थित असणे गरजेचे आहे. त्याबाबतचा आदेश शनिवारी सरकारने जारी केला.

सरकारी कर्मचा-यांनी कार्यालयात यावे म्हणून कदंब वाहतूक महामंडळाच्या बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रशासन खात्याने शनिवारी काढलेल्या आदेशातून सरकारी कार्यालये कशा प्रकारे चालावीत ते स्पष्ट केले गेले आहे. पोलीस, अग्नीशामक, आपत्ती व्यवस्थापन, पालिका प्रशासन सेवा ही खाती कोणत्याच निर्बंधांविना सुरू राहतील. याशिवाय अन्य सरकारी खात्यांनी 33 टक्के कर्मचारी घेऊन काम करणे अपेक्षित आहे. अ आणि ब गटातील अधिका-यांनी कार्यालयात यावे. क व त्याखालील गटतील 33 टक्के कर्मचा-यांनी कार्यालयात यावे असे नव्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कार्यालयात सोशल डिस्टंसिंग पाळले जावे. लोकांना त्यांची सेवाविषयक कामे कर्मचा-यांनी करून द्यावीत. 33 टक्के कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर बाकीचे जे कर्मचारी राहतात, त्यांनी घराकडून काम करावे, असे आदेशात म्हटले आहे. जे कर्मचारी अत्यंत गरजेचे त्यांनी रोज यावे व इतरांनी एक दिवस घरी राहून दुस-या दिवशी यावे अशी पद्धत सुरू करावी. सकाळी नऊ ते सायंकाळी चार, सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच व सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच अशा पद्धतीने तीन गटांमध्ये कर्मचा-यांनी नव्या वेळेप्रमाणो कार्यालयात यावे, असे आदेशात म्हटले आहे.  घराकडून काम करणारे अधिकारी फोनवर उपलब्ध असावेत. हा आदेश येत्या दि. 3 मेपर्यंत कायम असेल, असे अव्वल सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या