शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

CoronaVirus News: गोव्यात कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण २.८३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 21:47 IST

पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.६ टक्के

पणजी :  गोव्यात कोवीड चाचणीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण २.८३ टक्के एवढे आहे. तर पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५९.६ टक्के आहे. आरोग्य खात्याच्या अधिकृत आकडेवारी वरून हे स्पष्ट झाले. आतापर्यंत ९१ हजार १८२ जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातील २.८३ टक्के पॉझिटिव्ह आढळले.राज्यात आतापर्यंत कोविड पॉझिटिव्हचे १८ बळी गेले आहेत. आज मंगळवारी चिखली वास्को येथे ४७ वर्षीय इसमाचे  निधन झाले. केवळ मुरगांव तालुक्यातच ५६२ पॉझिटिव्ह रुग्ण या घडीला आहेत. वास्कोत कोवीड पॉझिटिव्ह मुळे होणाऱ्या मृत्यूचे थैमान घातले आहे. मांगुर हिलचे नगरसेवक पाश्कॉल डिसूजा (७५) यांचाही कोविडने मृत्यू झालेला आहे.राज्यात २२ जून रोजी कोविडचा पहिला मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील मोर्ले, सत्तरी या खेडेगावात ८५ वर्षीय वृद्धाचे निधन झाले.  त्याच दिवशी खारीवाडा, वास्को येथील ५८  वर्षीय इसम दगावला.  पाच दिवसांच्या अंतराने २७ जून रोजी फातोर्डा येथील ७६ वर्षीय महिलेला मृत्यू आला.  १ जुलै रोजी राजधानी पणजी परिसरात ताळगाव येथे ६६ वर्षांचा इसम मरण पावला. ३  जुलै रोजी दोन बळी गेले. यात कुडतरी येथील ७४ वर्षीय महिलेचा आणि खारी वाडा वास्को येथील ४५ वर्षीय इसमाचा समावेश आहे. ५ जुलै रोजी चिखली वास्को येथे ७२ वर्षीय इसम मरण पावला. ६ जुलै रोजी साखळी येथे देसाई नगर भागात ६५ वर्षे इसमाचा मृत्यू झाला. ९ जुलै रोजी नवे वाडे वास्को येथे ५० वर्षीय पुरुष मृत्यू पावला. त्यानंतर ११ जुलै रोजी वास्कोत तीन बळी गेले रूमडावाडा, वास्को येथे ८० वर्षीय वृद्धेचे निधन झाले. त्याच दिवशी दुपारी बायणा वास्को येथील ३१ वर्षीय तरुण दगावला आणि नंतर खारीवाडा येथे ७५ वर्षीय इसम दगावला. चिखली येथे महिला दगावली त्यानंतर पाळोळे, काणकोण येथील ४९ वर्षीय इसमाचे निधन झाले. १३ जुलै रोजी तीन बळी गेले. यात वास्को येथील ४७ वर्षीय  महिला, बेलाबाय वास्को येथील ६० वर्षीय वृद्धा आणि वरुणापुरी, वास्को येथील ५८ वर्षीय इसमाचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण उपचारासाठी मडगाव येथे स्वतंत्र इस्पितळ आहे. दक्षिण जिल्हा इस्पितळाचा कोविड इस्पितळ म्हणून सध्या वापर केला जात आहे. या ठिकाणी २०० खाटा आहेत. याशिवाय कोविड निगा केंद्रेही आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या