शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: काहीही करा, पण आमची कशाही प्रकारे सुटका करा; समुद्रात अडकलेल्या खलाशांची विनवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 18:50 IST

देवर याच्या जहाजावर 181 भारतीय खलाशी आहेत त्यातील 93 गोवेकर आहेत

सुशांत कुंकळयेकर

मडगाव: काहीही करा, पण आमची येथून कशाही प्रकारे सुटका करा. विदेशी प्रदेशात आणि तेही भर समुद्रात अडकलेल्या गोमंतकीय खलाशांची ही आर्त हाक असून त्यापुढे गोवा सरकारही हतबल झाले आहे. दुबई येथे जहाजावर अडकलेला केपेचा  24 वर्षीय खलाशी विजय देवर म्हणाला, आमच्यापैकी कित्येकजणांचा कंपनी बरोबरचा करार संपला आहे. आता त्यांना केवळ कंपनी जेवण देते, पण पगार मिळत नाही. त्यांना काही कामही नाही. अशा अवस्थेत ते कंटाळून गेले आहेत.

देवर याच्या जहाजावर 181 भारतीय खलाशी आहेत त्यातील 93 गोवेकर आहेत. या सर्वांना आपण मायदेशी परत कसे पोहोचू याचाच ध्यास लागून राहिला आहे. सध्या समाजमाध्यमावर हे खलाशी आपले व्हिडीओ टाकू लागले आहेत, जर फिलिपिन्स सारखा गरीब देश आपल्या नागरिकांना परत मायदेशी नेऊ शकतो तर भारता सारखा प्रबळ देश हा निर्णय का घेऊ शकत नाही असा त्यांचा सवाल आहे.

येथे गोव्यातही त्यांच्या कुटुंबीयांचा धीर खचू लागला आहे . करमणे येथील मारिया कार्डोझ म्हणाल्या, माझा 5 वर्षांचा मुलगा रोज विचारतो, डॅडी घरी कधी येणार? त्याला मी काय उत्तर देऊ? आपल्या पतीला परत आणावे यासाठी बुधवारी मुख्यमंत्री निवसासमोर धरणे धरलेल्या गिना परेरा म्हणाल्या, जेव्हा जेव्हा पतीचा फोन येतो त्यावेळी तो ढसा ढसा रडतो, हे आता सहनशक्तीच्या बाहेरचे झाले आहे.

आणखी एका महिलेने वाकोला मुंबई येथील मृत गोमंतकीय खलाशाचे उदाहरण देताना सांगितले, या खलाशाला चार लहान मुले आहेत. त्याची पत्नी आपल्याला मृत पतीचा चेहरा तरी पाहू द्या असा आक्रोश करते, हे सरकार आमच्यावरही हीच पाळी आणणार का? या महिलेने जो सवाल केला, तो इतरांचाही आहे.

टॅग्स :goaगोवा