शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
3
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
4
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
5
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
6
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
7
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
8
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
9
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
10
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
11
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
12
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
13
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
14
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
15
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
16
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
17
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
18
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
19
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
20
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका

CoronaVirus News: गोव्यातील कोविड मृत्यूंचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा तिप्पट जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 9:04 PM

गोवा फॉरवर्डचा आरोप; आता तरी लोकांचा जीव वाकविण्यावर लक्ष केंद्रित करा

मडगाव:  गोव्यात कोविडच्या मृत्यूची संख्या 303 वर पोहोचली आहे. दर 10 लाख माणसांमागे हे प्रमाण 150 पेक्षा अधिक आहे. कोविड मृत्यूची राष्ट्रीय सरासरी दर 10 लाख लोकांमागे 58 एव्हढी आहे. गोव्यातील मृत्यूंचे प्रमाण तिप्पट अधिक असून आता गोवा सरकारने  या गोष्टीकडे गंभीरपणे पाहण्याची गरज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

सरदेसाई म्हणाले, कोविड व्यवस्थापनाचे यश किती लोकांमध्ये कोविडचा प्रधुर्भाव झाला यात नसून किती लोकांचे प्राण वाचले यात आहे . जागतिक स्तरावरही ही सरासरी दार दशलक्ष लोकसंख्येमागे 120 एव्हढी  आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सरदेसाई म्हणाले, ही आकडेवारी पाहिल्यास गोव्यातील कोविड व्यवस्थापन बिघडले आहे. आता तरी निवडणुका आणि अन्य राजकीय अजेंड्यावर काम न करता गोवा सरकारने लोकांचे जीव कसे वाचतील यावर लक्ष केंद्रित करावे असे ते म्हणाले.

यासाठी जास्तीत जास्त लोकांची चाचणी करून त्यांचे अहवाल लवकर मिळतील अशी योजना तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अचूक निधान करण्यासाठी दक्षिण गोव्यातही आणखी एक अबोट चाचणी मशीन आणण्याची गरज आहे. जास्तीत जास्त खासगी इस्पिटलांना कोविड व्यवस्थापनात सामावून घेण्याची गरज असून रुग्णांसाठी पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होईल याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. वास्तविक हे सारे उपाय लॉकडाऊनच्या काळात घेण्याची गरज होती. त्यावेळी सरकार सुस्त राहिले निदान आतातरी जागे व्हावे अशी मागणी त्यांनी केली.

दक्षिण गोवा जिल्हा इस्पिटलाचे वरचे दोन मजले कोविड निगा केंद्र म्हणून वापरण्यात यावेत आणि रवींद्र भवनही कोविड निगा केंद्रात रूपांतरीत करावे अशी त्यानी मागणी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या