शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: गोव्यात अडकलेल्या ब्रिटिशांना दिलासा, पुढच्या आठवड्यात मायदेशी नेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 17:30 IST

ब्रिटिश उच्चायुक्त जॅन थॉंप्सन यांनी एका व्हिडीओद्वारे ही घोषणा प्रसारित केली आहे, मात्र एकाच बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

मडगाव: अजूनही गोव्यात अडकलेल्या हजारो ब्रिटिश पर्यटकांना दिलासा देणारी घोषणा ब्रिटिश सरकारने केली आहे. भारतात अडकलेल्या ब्रिटिशांना मायदेशी घेऊन जाण्यासाठी पुढच्या आठवड्यापासून खास चार्टर विमाने पाठविण्यात येणार आहेत. ब्रिटिश उच्चायुक्त जॅन थॉंप्सन यांनी एका व्हिडीओद्वारे ही घोषणा प्रसारित केली आहे, मात्र एकाच बरोबर सगळ्यांनाच घेऊन जाणे शक्य होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

सध्या उत्तर आणि दक्षिण या गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात सुमारे 1000 ब्रिटिश अडकून पडले आहेत. त्यातील काही जण भाड्याने घेतलेल्या खासगी घरात राहत असून, अशा लोकांचे विशेष हाल होत आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी त्यांची मारामार होते. गोव्यासह भारतात अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांना घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यासाठी ब्रिटिश विदेश सचिव डोमनिक रब आणि दळणवळण सचिव ग्रेटस शाप्स हे दोघेही भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संपर्कात आहेत.

या अडचणीच्या प्रसंगी काही युरोपियन समूह राष्ट्रेही  ब्रिटनच्या मदतीला धावून आली असून, फ्रँकफर्ट, झुरिक, डलंबिन, हेलसिंकी आणि रोम येथे आलेली विमाने ब्रिटनपर्यंत नेण्याची परवानगी दिली आहे. 3 एप्रिल रोजी गोव्यातून रोमला रवाना झालेल्या विमानात काही ब्रिटिश प्रवाशांनाही जागा ठेवण्यात आली होती, शनिवारी बल्गेरिया येथे गेलेले विमानही 100 ब्रिटीश प्रवाशांना आपल्याबरोबर घेऊन गेले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंड