शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: गोव्यात कोरोनाचे 30 नवे रुग्ण, एकूण संख्या 263 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 20:47 IST

मांगोरहीलला नवे 28 कोरोना रुग्ण आढळले

पणजी : राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी 263 झाली. मांगोरहीलला नवे 28 कोरोना रुग्ण आढळले. राज्यभरात मिळून नवे 30 रुग्ण आढळले. मांगोरहीलचे रुग्ण हे 20 ते 40 वर्षे वयोगटातील आहेत.आरोग्य सचिव श्रीमती निला मोहनन यांनी येथे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. मांगोरहीलला एकूण कोरोना रुग्ण संख्या 230 झाली आहे. शिरोडा येथील कोविद काळजी केंद्रात तेरा रुग्ण ठेवले गेले आहेत. केंद्र सुरू करून दोनच दिवस झाले आहेत. कोरोनाची लक्षणो दिसत नसलेले हे तेरा रुग्ण आहेत पण ते पॉझिटिव्ह आहेत, असे श्रीमती मोहनन यांनी स्पष्ट केले. सोमवारी गुजरातून रेल्वेने गोव्यात आलेला एकटा कोविड पॉझिटिव्ह आढळला. तसेच महाराष्ट्रातूनही रस्तामार्गे आलेला एकटा कोरोनाग्रस्त आढळला. उर्वरित 28 रुग्ण हे मांगोरहीलशीसंबंधित आहेत, असे मोहनन यांनी सांगितले.तेरा आरोग्य कर्मचाऱ्यांना लागणमांगोरहीलला यापूर्वी काम केलेले आरोग्य सेवा संचालनालयाचे तेरा कर्मचारी पॉङिाटीव आढळून आले आहेत. अगोदर आठ कर्मचारी करोनाग्रस्त आढळून आले होते. सोमवारी त्यात आणखी पाचजणांची भर पडली. सत्तरी, सांगेत काही कर्मचाऱ्यांची घरे आहेत. एका कर्मचाऱ्याचे कुटुंबही पॉझिटिव्ह आढळून आले. सर्वावर उपचार सुरू आहेत. श्रीमती मोहनन म्हणाल्या, की मांगोरहीलला ज्येष्ठ नागरिक तसेच व्याधी असलेले नागरिक, गरोदर महिला यांची आम्ही काळजी घेतो, त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून आम्ही जपतो. मात्र आतापर्यंत मांगोरहीलशीसंबंधित जे रुग्ण आढळले ते सगळे वीस ते चाळीस वर्षे वयोगटातील आहेत.2 रुग्ण ठीकसोमवारी कोरोना आजारातून उपचारानंतर दोन रुग्ण बरे झाले. त्यांना कोविद इस्पितळातून डिस्चार्ज दिला गेला. एकूण 1 हजार 716 व्यक्तींच्या कोविद चाचण्या केल्या गेल्या. 2 हजार 56 चाचण्यांचे अहवाल आले. एकूण 961 चाचण्यांचे अहवाल येणे बाकी आहे. पाच रुग्ण इस्पितळाच्या आयसोलेशन विभागात आहेत. मांगोरहीलच्या ओपीडीमध्ये सोमवारी काहीजणांच्या कोविद चाचण्यांसाठी नमुने घेतले गेले.20 हजार लोक गोव्यात दाखलगेल्या दि. 29 एप्रिलपासून आतापर्यंत एकूण 20 हजार 98 व्यक्तींनी गोव्यात प्रवेश केला. एकूण 1 लाख 9 हजार 40 व्यक्तींनी गोवा सोडला. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत 9 हजार 63 व्यक्तींना आतापर्यंत दंड ठोठावला गेला आहे. तसेच मास्क न घातल्याबाबत 23 हजार 440 व्यक्तींविरुद्ध कारवाई झाली आहे, असे महसूल सचिव संजयकुमार यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या