शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: गोव्यात 10 दिवसांत 2718 कोविड रुग्ण ठणठणीत; पण 49 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 15:43 IST

CoronaVirus News: मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ

पणजी : राज्यात कोविडग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढतेय. अनेक शहरांना व गावांना कोविडने वेढा घातला. मात्र त्याचबरोबर गेल्या दहा दिवसांत एकूण कोविडग्रस्तांपैकी 2 हजार 718 रुग्ण आजारातून पूर्ण बरे झाल्याचे स्पष्ट होत आहे. याच दहा दिवसांत 49 कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. या 49 पैकी बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहेत व त्यांना अन्यही काही आजार होते.दि. 10 ऑगस्ट ते दि. 19 ऑगस्ट या दहा दिवसांची आकडेवारी जर पाहिली तर, मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. पूर्वी दिवसाला केवळ एक किंवा दोघांचे बळी जायचे. मात्र अलिकडे दिवसाला कधी पाच तर कधी सहा कोविडग्रस्तांचा जीव गेल्याचे दिसून येते. 19 रोजी कहरच झाला. त्या दिवशी सर्वाधिक म्हणजे आठ कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला. या आठपैकी एकाचा मृत्यू आधीच झाला होता. त्याची शवचिकित्सा केली असता, त्याला कोविड होता हे स्पष्ट झाले. गेल्या 17 रोजीही जास्त मृत्यू झाले. त्या दिवशी सात कोविडग्रस्तांचा जीव गेला असे आरोग्य खात्याच्या बुलेटिनमधील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 18 ऑगस्ट रोजी पाचजणांचा कोविडने बळी घेतला. 10 ऑगस्ट रोजी पाचजणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. 11 रोजी सहाजणांचा मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांत एकही दिवस असा गेला नाही की, त्यावेळी कोविडग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली नाही. दि. 13 व 14 ऑगस्ट रोजी प्रत्येकी दोघा कोविडग्रस्तांचे निधन झाले.राज्यातील आतापर्यंत एकूण सुमारे तेरा हजार कोविडग्रस्तांपैकी 9 हजार कोविडग्रस्त आजारातून बरे झाले ही दिलासादायक गोष्ट आहे. गेल्या दहा दिवसांत यापैकी 2 हजार 718 व्यक्ती कोडिवच्या आजारातून ब:या झाल्या. 10 ऑगस्ट रोजी 213 तर 11 रोजी 272 व्यक्ती कोविडच्या आजारातून ठीक झाल्या. 19 ऑगस्ट रोजी 357 तर 18 ऑगस्ट रोजी 298 कोविडग्रस्तांचा आजार बरा झाला. राज्यात आतार्पयत एकूण 124 व्यक्तींचा कोविडमुळे बळी गेला, त्यापैकी 49 कोविडग्रस्तांचे मृत्यू हे केवळ दहा दिवसांत झाले आहेत. म्हणजे रोज सरासरी पाच व्यक्तींचा जीव गेल्या दहा दिवसांत गेल्याचे स्पष्ट होत आहे.गेल्या दहा दिवसांतच राज्यातील काही अतिमहनीय व्यक्तींना कोविडची लागण झाल्याचे दिसून येते. केंद्रीय आयुष मंत्रलयाचे मंत्री श्रीपाद नाईक, आमदार नीळकंठ हळर्णकर, सुदिन ढवळीकर, चर्चिल आलेमाव तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना गेल्या दहा दिवसांत कोविडची लागण झाली. राज्यातील खासगी इस्पितळांमध्ये वीस टक्के खाटा कोविडग्रस्तांसाठी ठेवण्यात आल्याचा दावा सरकार करते तरी प्रत्यक्षात तीन इस्पितळांनी फक्त तीन-चार एवढय़ाच खाटा स्वत:च्या इस्पितळात कोविडग्रस्तांसाठी ठेवल्या असल्याची माहिती मिळते. एका आमदाराला खासगी इस्पितळात ठेवण्यासाठी खाटच उपलब्ध होत नव्हती, त्यावेळी राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला व मग खाट उपलब्ध केली गेली. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात किंवा मडगावच्या कोविड इस्पितळात जाणा:या रुग्णांची संख्या वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या