शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने घेतला ‘यू-टर्न’

By admin | Updated: January 8, 2016 01:46 IST

पणजी : काँग्रेसचे उपाध्यक्ष मोती देसाई यांनी बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ माजली व पक्षाला यू-टर्न घ्यावा लागला.

पणजी : काँग्रेसचे उपाध्यक्ष मोती देसाई यांनी बुधवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानंतर काँग्रेस पक्षात मोठी खळबळ माजली व पक्षाला यू-टर्न घ्यावा लागला. प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी नावेली विधानसभा मतदारसंघातून लढावे, अशी सूचना काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेली नाही, ते आपले व्यक्तिगत मत आहे, असे देसाई यांनी गुरुवारी आणखी एक पत्रक काढून जाहीर केले. फालेरो यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नावेलीतून निवडणूक लढण्यास सांगितले आहे, असे मोती देसाई यांनी बुधवारी पत्रकात म्हटले होते. म्हणजेच फालेरो यांना गांधी यांनी नावेलीसाठी काँग्रेसचे तिकीटच जाहीर केले, असा अर्थ होतो. या विधानामुळे काँग्रेसच्या काही आमदारांना, पदाधिकाऱ्यांना व प्रमुख कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. केवळ एका मतदारसंघासाठी तिकीट कसे काय जाहीर होऊ शकते, असा प्रश्न सर्वांना पडला. काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांच्यापर्यंत त्याविषयी तक्रारी गेल्या. त्यानंतर गुरुवारी स्वत: फालेरो यांनीही एक पत्रक प्रसिद्धीस देऊन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. फालेरो यांनी म्हटले आहे की, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी निवडणूक लढविण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. उमेदवार निवडीसाठी काँग्रेस पक्षाकडे निश्चित प्रक्रिया आहे. गट समित्या, जिल्हा समित्या, प्रदेश निवडणूक समिती, छाननी समिती यांच्या स्तरावर उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षाची केंद्रीय निवडणूक समिती अंतिम निर्णय घेते. (खास प्रतिनिधी)