शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

काँग्रेसकडून रवींना कारणे दाखवा नोटीस?

By admin | Updated: May 25, 2014 01:06 IST

काँग्रेसकडून रवींना कारणे दाखवा नोटीस?

पणजी : आपल्या पराभवास रवी नाईक यांनी काँग्रेसचे मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना जबाबदार धरल्याने काँग्रेस पक्षाने या प्रकाराची गंभीरपणे दखल घेतली आहे व नाईक यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचे ठरविले आहे. गेल्या दहा वर्षांत यूपीए सरकारने दिलेले योगदान लोकांसमोर मांडण्याबाबत पंतप्रधान सिंग हे कमी पडले व त्यामुळे काँग्रेसविरोधी लाटेत आपला पराभव झाला, असे विधान उत्तर गोव्यातून लोकसभा निवडणूक लढविलेल्या नाईक यांनी गेल्या आठवड्यात केले होते. शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी सांगितले की, रवी नाईक यांना लवकरच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हे कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहेत. पक्षविरोधी कारवाया करणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष फर्नांडिस यांना दिले आहेत. कुठलाही काँग्रेस नेता स्वत:चे मत व्यक्त करू शकतो; पण हे मत काँग्रेसच्या व्यासपीठावर किंवा बंद खोलीआड होणार्‍या बैठकीत व्यक्त करायला हवे. पक्षाविरुद्ध विधाने करायची असल्यास कुणीही अगोदर पक्ष सोडायला हवा, असे कामत म्हणाले. फोंडा विकास समितीनेही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध शुक्रवारी विधाने केली आहेत. जॉन फर्नांडिस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या समितीने केली आहे. फोंडा विकास समितीला राजकीय भूमिका नाही किंवा राजकारणात स्थान नाही. या समितीने केलेल्या विधानांमागील बोलविता धनी कोण, ते समितीने सांगावे. रवी नाईक यांच्या सांगण्यावरून समितीने विधाने केली आहेत काय तेही स्पष्ट करावे, असे कामत म्हणाले. (खास प्रतिनिधी)